Team Agrowon
अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः राज्यातील शेतकरी कष्टाळू आहेत. पण, त्यांना शास्त्रशुध्द शेती करण्यासाठी अधिक शहाणे करण्याची गरज आहे.
उत्तम शेती करायची असेल तर उत्पादन खर्च मर्यादित ठेवून उत्पादनात वाढ करावी लागेल, त्यासाठी आधुनिक शेतीची कास धरावी लागेल.
शेतकऱ्यांना ज्ञान, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे आदर्श धडे देण्याचा वसा घेतलेल्या ‘अॅग्रोवन’चे तुम्ही जिज्ञासू वाचक व्हा, असे आवाहन केंद्रीय असे उद्गगार केंद्रीय रेल्वे, कोळसा व खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे केले.
औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीमधील ‘कलाग्राम’ परिसरात ‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या चार दिवसीय राज्यव्यापी कृषी प्रदर्शनाचे काल (ता.१३) शानदार उद्घाटन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर राज्याचे फलोत्पादन व रोहयो मंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे, अॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, सकाळच्या मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने,
कन्हैया अॅग्रो उद्योग समुहाचे कार्यकारी संचालक मच्छिंद्र लंके, कन्हैया अॅग्रोचे कार्यकारी संचालक सुरेश पठारे, बी. जी. चितळे डेअरीचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर कुलकर्णी, तृप्ती हर्बलचे मच्छिंद्र मुंडे, महाउर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे, माजी आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर होते.