
जालना : शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये अधिक उत्पादनाचे (Agriculture Production) तंत्रज्ञान आत्मसात करावे. यासाठी शेती नियोजनामध्ये (Agriculture Planning) जमिनीचे आरोग्य (Soil Health) चांगले ठेवण्यासाठी मृद् व पाणी परीक्षणावर (Water Test) आधारित सुयोग्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंबन करणे आवश्यक असल्याचे मत कोल्हापूर येथील कृषी अभ्यासक प्रताप चिपळूणकर (Pratap Chipalunkar) यांनी व्यक्त केले.
कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी आणि कृषी विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान मंडळाचे ३०४ वे मासिक चर्चासत्र आणि जागतिक मृदा दिनानिम्मीताने २०२२ कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. चिपळूणकर बोलत होते.
या कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक विजय अण्णा बोराडे, महाराष्ट्र सीताफळ उत्पादक महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, प्रगतिशील शेतकरी अंकुशराव भालेकर, नंदकिशोर पुंड, जालना जिल्ह्याच्या कृषी तंत्र अधिकारी प्रियांका जगताप आणि कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने उपस्थित होते.
श्री. चिपळूणकर म्हणाले, की अलीकडील काळात शेती व्यवसायातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापर तसेच जमीन सतत पिकाखाली राहण्यामुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. पिकाची खुंटलेली वाढ, उत्पादनाचे गुणांमध्ये घट आदी समस्याग्रस्त क्षेत्रांमध्ये वाढ होत आहे. जमिनीची जैविक सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीची कमीत कमी मशागत करावी. शेतातील काडी-कचरा शेतात कुजवावा, यानुसार शेतीवरील खर्च कमी करून जमिनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले
जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने जालना जिल्ह्यातील शेतकरी विष्णू नानकर, सौ. मंदाकिनी काळे व अरुण सांगळे यांना शेतामधील मातीत ऑरगॅनिक कार्बन वाढवल्याबद्दल कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मृदा आरोग्य पत्रिकांचेही मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. जिल्हा मृदा सर्वेक्षण मृदा चाचणी अधिकारी श्री. कोरडे यांनी सर्व मान्यवरांचे व शेतकऱ्यांचे आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.