soil health
soil health

Soil Health : उत्पादनासाठी मातीचे आरोग्य जोपासा

जमिनीची पीक उत्पादकता टिकवायची आणि वाढवायची असेल, तर मातीच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. एस. शिरगुरे यांनी व्यक्त केले.
Published on

सोलापूर ः जमिनीची पीक उत्पादकता (Crop Productivity) टिकवायची आणि वाढवायची असेल, तर मातीच्या आरोग्याकडे (Soil Health) लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. एस. शिरगुरे यांनी व्यक्त केले.

soil health
Soil Health : मातीचे आरोग्य का जपले पाहिजे?

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दत्तकग्राम किणीवाडी (ता. अक्कलकोट) येथे जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. शिरगुरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ला. रा. तांबडे उपस्थित होते. विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नितीनकुमार रणशूर उपस्थित होते.

soil health
मातीचे आरोग्य जपणे गरजेचे ः भुसे

डॉ. शिरगुरे म्हणाले, की शेती उत्पन्नासाठी जमिनीचे महत्त्व अनन्य साधारण आहे. पण आज रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. त्यासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खते यांचा मध्य साधला गेला पाहिजे. जमिनीची पीक उत्पादकता टिकवायची असेल, तर मातीच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेणखताचा वापर अधिक वाढवावा, असेही ते म्हणाले.

डॉ. तांबडे यांनी वर्षानुवर्षे जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण कमी होत जात आहे. भविष्यात रासायनिक खतांचा वापर कमी करून त्या जागी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र आपणास मार्गदर्शन करेल, असेही ते म्हणाले.

प्रमुख व्याख्याते डॉ. रणशूर यांनीही पिकाच्या वाढीसाठी प्रमुख अन्नद्रव्याबरोबरच इतर दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक विषय विशेषज्ञ प्रदीप गोंजारी यांनी केले. विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी सूत्रसंचालन आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ विवेक माने यांनी आभार मानले.

जमिनीच्या आरोग्यपत्रिकेचे वाटप

जागतिक मृदादिनानिमित्त किणीवाडीतील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीत कोणते घटक अधिक आहेत, कोणते कमी आहेत, किंवा कोणते घट समतोल प्रमाणात आहेत, यासह जमिनीच्या गुणवैशिष्ट्याची माहिती या पत्रिकेतून मिळणार आहे. त्यावर जमिनीचे खत व्यवस्थापन करणे सोपे जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com