Kartiki Ekadashi : पंढरपुरात कार्तिकी यात्रेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

शुक्रवारी होतोय मुख्य सोहळा
Kartiki Ekadashi
Kartiki EkadashiAgrowon

सोलापूर : येत्या शुक्रवारी (ता. ४) होत असलेल्या कार्तिक शुद्ध एकादशीसाठी पंढरपुरात (Pandharpur) श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या (Shree Vitthal Rukhmini) दर्शनासाठी परराज्यांसह राज्यातील इतर जिल्ह्यांतून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. यात्रा भाविकांच्या आरोग्य, सुरक्षितता व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी (Arvind Mali) यांनी दिली.

Kartiki Ekadashi
Indian : स्वतः भारतीय म्हणून शाबूत राहू !

शुक्रवारी पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होत आहे. कार्तिकी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र, वाळवंट, ६५ एकर परिसर, पत्रा शेड, दर्शन बारी आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी १३४८ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, यामध्ये ३४८ कायम, तर १००० हंगामी कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत.

भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी शहरातील सार्वजनिक बोअरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी, तसेच खसगी विहिरींचे क्लोरिनेशन करण्यात आले आहे. तसेच शहरासह ६५ एकर, वाळवंट, पत्राशेड आदी ठिकाणी जंतनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या,

कॉम्पॅक्टर, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी आदी वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पत्राशेड, वाळवंट ६५ एकर परिसर, रेल्वे मैदान या आवश्यक ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात येणार आहेत. वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये म्हणून प्रतिबंधक पथकांची नेमणूकदेखील करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी माळी यांनी दिली.

https://www.youtube.com/watch?v=9aHalku61Jgअतिक्रमणधारकांना नोटिसा

सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून, शहरातील व वाळवंटातील अतिक्रमणे काढण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहेत. शहरातील विविध ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू असून, आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येत आहेत. तसेच विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्री. माळी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com