Indian : स्वतः भारतीय म्हणून शाबूत राहू !

भावनिकता पक्की ध्यानात घेऊन आपल्या देशातील काही विशिष्ट धुरीणांनी सतत आपल्या ‘सत्ताकारणासाठी’ मतदारांना आपण धार्मिकतेचे रखवालदार असल्याचे आभासीपणातून दाखवलेले आहे.
Indian
Indian Agrowon

भावनिकता पक्की ध्यानात घेऊन आपल्या देशातील काही विशिष्ट धुरीणांनी सतत आपल्या ‘सत्ताकारणासाठी’ मतदारांना आपण धार्मिकतेचे रखवालदार असल्याचे आभासीपणातून दाखवलेले आहे. त्यामुळे मग धर्मोपचारक आजच्या सोयीसोयीने आपल्या अल्पवाणीतून विश्लेषण करतात. काहींना ते ‘अमृततुल्य’ वाटते. ज्याने-त्याने क्षणोक्षणी विचार करून स्वातंत्र्य उपभोगताना ‘भारतीय’ ही समूहभावना राखली तर भारतात आपणच ‘बंधू-भावाने’ नांदतो. पण असे भारतात अपवाद सोडले, तर स्वातंत्र्यपूर्व काळातही एकीची वज्रमूठ दिसत नव्हती. जहाल व मवाळ गट होतेच.

जहाल देशीय आणि मवाळ परकीय सौहार्दक म्हणूनच बघितले गेले. डावे-उजवेही आपण अनुभवलेले आहेत. त्यामुळे राजकीय गटांना आयतेच आपापले अनुयायी मिळाले आणि मिळतात, मिळत राहतील. असो, आपण स्वतःचे खरोखर आत्मपरीक्षक असू ना तर कुणाची किमान मानसिक गुलामगिरी तरी करण्याची अवदसा आठवू नये. पण त्यासाठी इकडे झुका, तिकडे झोका या झोकाझुकीत नाहक वेळ व बाता या पलीकडे काहीही ठाशीव होत नाही.

Indian
Chana Sowing : हरभऱ्याचा पेरा वाढेल का?

सामान्य माणसाला रोटी, कपडा और मकानच प्यारा आहे. फार तर पढाई आणि सेहतमंद जिंदगी प्यारी आहे. उपलब्ध नैसर्गिक संसाधने, त्यांचा शोध आणि वापर करून देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर सोयीसुविधा पुरविता येत असतील तर कोणताही देश बाकी गोष्टी जाऊ द्या पण ‘आनंदी’ असेल. धर्म, जात, भाषा, रोजगार, उद्योग, पायाभूत विकास, शाश्‍वत प्रगती आणि नैसर्गिक जीवन पद्धती या महत्त्वाच्या गोष्टी नीट सुफळल्या तर सजग विरोधी पक्षाला कुठल्याही भारतीयाला जोडाजोडीची गरजच काय? पण असे होते का, हा खरा राष्ट्र प्रश्‍न आहे?

Indian
Chana Cultivation : बुलडाण्यात हरभरा लागवड होणार दोन लाख हेक्टरवर

कुणी देश चालविणारे म्हणतात, आम्ही ‘संविधानाचे’ पाईक आहोत. कुणीतरी ‘धर्म’ जागवून राज्य-राष्ट्र हाकणारे. पण ‘कर्तव्य-कर्म’ श्रेष्ठ समजून ज्याने-त्याने आपल्या सत्ताप्रहारात समाज हितैषी भूमिका पार पाडली तर जमते ना! लोकानुनय नेते करतात. लोक नेतानुनय करू लागले तर काय होईल? ते तिकडचे-आम्ही इकडचे एकाच भारतीय समाजनदीचे दोन काठ होतील.

इकडचे माणसं इकडून ओरडणार, तिकडचे तिकडून हाकारे-पुकारे करणार. सत्ताधारी-विरोधक अन् विरोधक पुन्हा सत्ताधारी असा महापूर नदीपात्रातून-सत्तापात्रातून वाहत जाणार. फक्त आम्ही ‘काठावरचे’, ना ‘धारदार.’ बघा, भारतीयांनो! कुण्या कळपातला एल्गार मोठा वाटत असेल पण स्वतःचा हुंकार हा जनामनाचा आकार होऊ शकतो. स्वतः भारतीय म्हणून शाबूत असाल ना तेव्हा!

उदारमतवादाचा पुकार करावा. नव विचारांची मांडामांड एकमेकांना सांधणारी असावी. नाही तर या फटी फटीतच ‘धर्म की जय हो’च्या पाचरी ठाकून ठोकून बसवल्या जातात. मग आपण या फटी ध्यानात घेऊन जगतोच ना? देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनच भांडवलशाही आहे. नंतर ‘कष्टकऱ्यांचे राज्य’ पुकारले गेले. मग ‘शेतकऱ्यांचे जग’ अवतरण्याची लढाई सुरू झाली. कुणी कुणी अधूनमधून ‘महिलाराजची’ लहर आणतात.

दिव्यांग व तृतीयपंथी यांचे काय? सर्वसमावेशकता आपल्याकडे सोडून एककल्ली कार्यक्रम सुरू असतो आणि तिकडे पूर्वीचे ‘साहेब’ आपल्या सुनकला ‘ऐस सर’ म्हणतात. गोडी गुणाची-कामाची आहे. ‘लोकशाही’ याला म्हणतात. सत्ता गेली की विरोधक म्हणून लोकशाहीत ‘टीकाकार’ व्हायचे आणि सत्ता आली की ‘विकासकाचा’ बोलबाला. म्हणजे सदैव सत्तेच्या जत्रा सजवण्यासाठीचा आटापिटा.

विनोबांची ‘भूदान’ चळवळ सर्वात्मकता अवतरणारी होती. बाबा आमटे यांची ‘भारत जोडो’ यात्रा मनामनांत ‘भारतीयत्व’ पेरणारी आणि अ-विनाशकालीन आहे. शरद जोशींनी घरादाराचा त्याग करूनच ‘भारतीय शेतकरी’ एकवटवला. महिलांच्या नावावर जमीन करून तिला त्यांनी ‘भूलक्ष्मी’ केले. त्यामुळे भावे-आमटे-

जोशींना ‘जन चळवळीचे’ नायक म्हणून अंतिम स्वरूप लाभले.

आता वाढते सत्तेचे बळकटीकरण, इतर राजकीय-प्रादेशिक पक्षांचे बीबूडपण करण्याचे प्रयत्न, देशात नव्हे जगात अंबानीनंतर अदानी श्रीमंतांच्या यादीत येण्याचा धावा, परदेशीय माल आयात करून देशातील उत्पादकांना विशेषतः शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळण्याची खटपट, कानठळ्या बसणारे-डोळे मिटून घ्यावेत असे आरोप-प्रत्यारोप, अंदरबाहेरचा खेळ, सायबर गुन्हे, महागाईच्या झळा, रोजगाराची कासवगती ठळकपणे दिसते.

दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘मेगा भरतीत’ इंडियाच्या सरकारने ७५ हजार पोरांना नियुक्तीपत्र दिलीत. २०२३ पर्यंत दहा लाख पोरांना नोकऱ्‍या सरकार देणार आहे. ९ लाख, २५ हजार नोकऱ्या १४ महिन्यांत जर सरकारने दिल्या? तर भारतीय ‘सत्यमेव जयते’ म्हणतील. अन्यथा ‘भारतमाता’ जयजयकार ऐकू येणारच की! भारताच्या ‘संपूर्ण प्रगतीचे ध्येय’ गाठायचे एवढे सगळे सहज आपल्या भारतीय समाजकारणात झाले, तर ‘जोडो’ नव्हे, भारतीय एकमेकांना ‘हात’ जोडतील हो!

- अरुण चव्हाळ, परभणी (७७७५८४१४२४)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com