Weather Station : पीकनुकसान मदतीसाठी पडणाऱ्या पावसाची अचूक नोंद आवश्यक

जागतिक हवामान दिन विशेष
Weather Station
Weather StationAgrowon
Published on: 
Updated on: 

माणिक रासवे ः अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः अतिवृष्टी, तापमान वाढ, गारपीट आदी नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान (Crop Damage) होते. बाधित शेतकऱ्यांना पीकविमा (Crop Insurance) योजनेचा लाभ तसेच शासकीय आर्थिक मदत देण्यासाठी पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग आदी घटकांची अचूक नोंद होणे आवश्यक आहे.

त्या दृष्टिने महसूल मंडल स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र (Weather centre) निकषानुसार योग्य जागी कार्यन्वित करण्याची गरज आहे. तरच वस्तुनिष्ठ आकडेवारी उपलब्ध होईल.

त्याआधारे नुकसानीची व्याप्ती निश्चित करता येईल. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे शक्य होईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रकल्पाचे मुख्य समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी केले.

काही वर्षांपूर्वी महसूल मंडल स्तरावर बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्रद्वारे पावसाच्या नोंदी मॅन्युअली घेतल्या जात असत. परंतु या पद्धतीच्या नोंदीमध्ये अचुकता कमी होती.

आता राज्यातील महसूल मंडलांचे मुख्यालय असलेल्या गावाच्या ठिकाणी स्थापित स्वंयचलित हवामान केंद्रामध्ये नोंद होणारी घटकांची आकडेवारी वापरली जात आहे.

Weather Station
Weather Station : शेतकऱ्यांनी पर्जन्यमापक यंत्राला घातला पुष्पहार

परंतु गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणच्या स्वयंचलित हवामान केंद्राच्या परिसरात काही ठिकाणी शासकीय कार्यालयाच्या इमारतीची तर काही ठिकाणी खासगी इमारतींची बांधकामे झाली आहेत. परिसरात उंच झाडीझुडपांची वाढ झाली आहे.

देखभाल दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे पावसासह अन्य बाबींच्या नोंदी अचूक मिळण्यास अडथळे येत आहेत. प्रत्यक्ष झालेला पाऊस आणि या केंद्रात नोंद झालेला पाऊस यामध्ये तफावत आढळून येत असल्याचे आढळून आल्यानंतर त्याबाबत विविध मंडलांतील शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या.

त्यामुळे दोन वर्षांपू्र्वी हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या स्वयंतचलित हवामान केंद्रांच्या जागा निकषानुसार आहेत की नाही याची पडताळणी कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठातील हवामान तज्ज्ञांच्या पथकाने केली.

Weather Station
Weather Station : वेध नव्या हवामान केंद्रांचा!

अनेक ठिकाणी या केंद्राच्या परिसरात झडीझुडपे वाढल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा केंद्र निकषानुसार असलेल्या जागेत पुनरस्थापित करण्याची सूचना करण्यात आली.

परभणी जिल्ह्यातील अनेक महसूल मंडलांतील शेतकऱ्यांकडून स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये पावसाच्या योग्य नोंदी होत नसल्याबाबत तक्रारी येत आहेत.

जिल्ह्यातील महसूल मंडलांतील स्वयंचलित हवामान केंद्रांची पडताळणी करावी. त्यानंतर अयोग्य ठिकाणी असलेल्या हवामान केंद्राचे निकषानुसार जागेत स्थलांतर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.






प्रतिक्रिया,
आमच्या गावातील स्वंयचलित हवामान केंद्राजवळप्राथमिक आरोग्य केंद्राची इमारती बांधली आहे. परिसरातउंच झाडे वाढली आहेत. त्यामुळे सदोष नोंदी होत आहेत. या हवामान केंद्राचे योग्य जागी स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन जिल्हाप्रशासनास पाठवून दोन वर्षे झाली आहेत.स्थलांतराची कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करावी.
बाबासाहेब रनेर कृषिभूषण, बाभळगाव, ता.पाथरी, जि.परभणी

स्वयंचलित हवामान केंद्र मोगळ्या जागी, जवळ पाणवठा नसलेल्या, उंच जागी जवळ इमारती नसलेल्या ठिकाणी असावे.यासह अन्य निकषानुसार नसलेल्या केंद्रामध्ये अचूक नोंदीसाठी अडथळे येतात.
डॉ.कैलास डाखोरे, मुख्य समन्वयक, ग्रामीण कृषी मोसम सेवा प्रकल्प, वनामकृवि, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com