Soil Test : माती, पाणी, देठ परीक्षणासाठी फिरती प्रयोगशाळा सुरू करावी

निमगावमधील माती-पाणी, पान-देठ परीक्षण प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. माढा वेल्फेअर फाउंडेशनने आता फिरती प्रयोगशाळा सुरु करून शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, त्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करू, असे आश्वासन आमदार बबनराव शिंदे यांनी दिले.
Soil Test
Soil Test Agrowon

सोलापूर ः निमगावमधील माती-पाणी (Soil Water), पान-देठ परीक्षण (Soil Test) प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. माढा वेल्फेअर फाउंडेशनने (Madha Welfare Foundation) आता फिरती प्रयोगशाळा सुरु करून शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, त्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करू, असे आश्वासन आमदार बबनराव शिंदे यांनी दिले.

Soil Test
Soil : तुम्ही माती खाल्ली का?

माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथे विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या प्रक्षेत्रावर मुकुल माधव फौंडेशन व फिनोलेक्स पाइप यांच्या सहयोगाने आणि माढा वेल्फेअर फौंडेशन, कृषी विभाग सोलापूर यांच्या साह्यातून अत्याधुनिक माती, पाणी, देठ परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. तिच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार शिंदे बोलत होते.

फिनोलेक्स कंपनीचे सीईओ अजित वेंकटरमन, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, आमदार संजय शिंदे, नितीन धार्मिक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ राजीव मराठे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तहसीलदार राजेश चव्हाण विठ्ठलगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन धनराज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Soil Test
Agriculture : यंदाचा क्रांतिअग्रणी पुरस्कार डॉ. गणेश देवी यांना जाहीर

आमदार शिंदे म्हणाले, माती-पाणी परीक्षणाची ही प्रयोगशाळा जागतिक दर्जाची झाली असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन धनराज शिंदे यांनी येणाऱ्या काळातील अडचणीची गरज ओळखून शेतकऱ्यांप्रती दूरदृष्टी ठेवून प्रयोगशाळेची उभारणी मागचा उद्देश स्पष्ट केला.

उत्पादन खर्च होईल कमी

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी आपल्या मनोगतात उपस्थित शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॅा.राजीव मराठे यांनी बदलत्या वातावरणामुळे पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे जाणवत असून आधुनिक शेती करताना माती, पाणी, पान- देठ परीक्षण करणे काळाची गरज आहे. त्यानुसार शेती केली, तर उत्पादन खर्च कमी होऊन दर्जेदार उत्पन्न मिळेल, असे मत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com