Crop Loan : रब्बीत ९९६ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

यावर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात परभणी, हिंगोली जिल्ह्यातील बँकांना एकूण ९९६ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

परभणी ः यावर्षीच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabi Season) परभणी, (Parbhani) हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील बँकांना एकूण ९९६ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज (Crop Loan) वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दोन जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीककर्ज (Crop Loan Supply) वाटपाच्या उद्दिष्टात १३७ कोटी ६४ लाख रुपये वाढ करण्यात आली आहे.

Rabi Season
BSKKV Crop Advisory : कोकण सल्ला

परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात विविध बँकांना ६२४ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात १७ कोटी ८२ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

Rabi Season
Crop Insurance : शेतकऱ्यांचा पीकविमा कंपनी विरोधात एल्गार

गतवर्षी ६०६ कोटी ९८ लाख रुपये उद्दिष्ट असताना मार्च अखेर ५५ हजार ९१८ शेतकऱ्यांना ४४३ कोटी ११ लाख रुपये (७३ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले होते. त्यात ३२ हजार २०७ शेतकऱ्यांना २१४ कोटी रुपयाचे नवीन पीककर्ज तसेच २३ हजार ७११ शेतकऱ्यांनी २२८ कोट ७३ लाख रुपयाच्या पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले होते.

Rabi Season
Crop Insurance : संत्रा पिकासाठी विमा योजना

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात ३७२ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. गतवर्षी (२०२१-२२) तुलनेत यंदा पीककर्जाच्या उद्दिष्टात ११९ कोटी ८२ लाख रुपये वाढ करण्यात आली आहे. गतवर्षी २५२ कोटी १७ लाख रुपये उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात ३२ हजार १०८ शेतकऱ्यांना २३३ कोटी रुपये (९२. ४६ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले.

रब्बी हंगाम २०२२-२३

पीककर्ज वाटप उद्दिष्ट

(कोटी रुपये)

बँक परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा

व्यापारी बँका ३६१.७३ २११.०८

महाराष्ट्र ग्रामीण बँक ८६.९५ ४९.५७

जिल्हा सहकारी बँक १२९.१८ १११.३५

खासगी बँका ४६ ९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com