BSKKV Crop Advisory : कोकण सल्ला

मुंबई यांच्या कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोकणातील काही ठिकाणी ४ ऑक्टोबर, २०२२ या दिवशी अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
BSKKV Crop Advisory
BSKKV Crop AdvisoryAgrowon
Published on
Updated on

हवामान अंदाज ः

१) प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या कडून प्राप्त झालेल्या हवामान (Weather Forecast Department) अंदाजानुसार कोकणातील काही ठिकाणी ४ ऑक्टोबर, २०२२ या दिवशी अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आकाश सर्वसामान्यपणे ढगाळ राहील.

२) विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) (ERFS)कोकण विभागात ५ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पावसाचे प्रमाण हे सरासरीइतके राहण्याची शक्यता आहे.

BSKKV Crop Advisory
Kharip Crop : परभणातील १०८ गावांत हंगामी पैसेवारी ५० पेक्षा कमी

खरीप भात

अवस्था ः

दाणे भरण्याची ते पक्वता अवस्था (हळव्या जाती)

फुलोरा ते दाणे भरण्याची अवस्था (निम गरव्या)

पोटरी ते फुलोरा अवस्था (गरव्या जाती)

-मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी हळवे भात कापणीस तयार झाले असेल, अशा ठिकाणी भात कापणीची कामे पावसाचा अंदाज घेऊन करावीत.

BSKKV Crop Advisory
Tur Crop Management : तुर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोणते उपाय कराल?| Agrowon | ॲग्रोवन

-कापणी करताना भात शेतात न ठेवता ठराविक वेळेनंतर भात सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था करावी. मळणी करून उत्पादित भात कोरड्या व सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावे.

-निमगरवे भात पीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत आणि गरवे भात पोटरी ते फुलोरा अवस्थेत असल्याने पाण्याची पातळी ५ ते १० सें.मी. पर्यंत ठेवावी. आवश्यकतेनुसार बाह्य स्रोतांतून पाणी घेऊन पाणी पातळी नियंत्रित करावी.

BSKKV Crop Advisory
Crop Damage : नुकसानग्रस्तांना पीकविम्याचा लाभ द्या,

- निमगरवे भात पीक फुलोरा अवस्थेत असताना नत्र खताची तिसरी मात्रा युरिया ४३५ ग्रॅम प्रति गुंठा पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी.

- भात पीक दुधाळ अवस्थेत असताना लोंबीवरील ढेकण्या किडीच्या प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे या किडीच्या प्रादुर्भाव तपासण्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे. लोंबीवरील ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.लि. किंवा

BSKKV Crop Advisory
Sugar Export : साखर निर्यातीवर बंधने लादण्याचे धोरण बंद करा

डेल्टामेथ्रीन (२.८% प्रवाही) ०.९ मि.लि. किंवा

इमिडाक्‍लोप्रिड* (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मि.लि.

- पावसाची उघडझाप तसेच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पाणथळ भागातील निम गरवे आणि गरवे भात खाचरातील पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत, पिकाची दाट लागवड आणि नत्र खताची अतिरिक्त मात्रा दिलेल्या क्षेत्रामध्ये तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

BSKKV Crop Advisory
Sugar Mill : सुधाकरपंत परिचारकांचे पांडुरंग कारखान्याला नाव

तुडतुडे व त्यांची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. परिणामी भाताची पाने पिवळी पडतात आणि नंतर वाळतात. पिकाचे तपकिरी तुडतुड्यांच्या प्रादुर्भावासाठी सातत्याने निरीक्षण करत राहावे.

जर रोपाच्या चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी

थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्लूजी) ०.२ ग्रॅम किंवा फिप्रोनिल (५

टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मि.लि.

फवारणी पावसाची उघडीप असताना आणि चुडाच्या बुंध्यावर पडेल अशी करावी.

तसेच खाचरात पाणी जास्त काळ न साठवता फोडून लावावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी.

BSKKV Crop Advisory
Sugar Export : साखर निर्यातीवर बंधने लादण्याचे धोरण बंद करा

-पावसाची उघडझाप संभवत असल्याने माळजमिनीवर असलेल्या हळव्या जातीच्या भात पिकावर लष्करी अळीचा (शास्त्रीय नाव ः Mythimna separata) प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. असा प्रादुर्भाव दिसत असल्यास तयार झालेल्या हळव्या भात पिकाची त्वरित कापणी करावी. भात कापणीनंतर जमिनीची खोल नांगरणी करावी, त्यामुळे किडीचे सुप्तावस्थेतील कोष नष्ट होण्यास मदत होईल.

BSKKV Crop Advisory
Sugar Mill : नॅचरल उद्योग समूह पंधरा टक्के लाभांश

- आभासमय काजळी या बुरशीजन्य रोगामुळे भाताच्या लोंब्याचे रूपांतर काळसर हिरव्या रंगाच्या मखमली गाठींमध्ये होते. लोंबीतील काही दाणेच रोगग्रस्त होतात. भात पीक पोटरी अवस्थेच्या शेवटच्या टप्प्यात ते फुलोरा अवस्थेत असताना रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी.

हेक्झाकोनॅझोल १ मि.लि. किंवा प्रोपीकोनॅझोल १ मि.लि.

काजू

अवस्था ः पालवी अवस्था

-काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या (टी मोस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही कीड पालवीतील रस शोषून घेत असल्यामुळे नवीन पालवी सुकून जाते. नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन* (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि.

ही फवारणी पावसाची किमान ५ ते ६ तास उघडीप मिळेल असे पाहून करावी.

-काजू बागेतील गवत, रोगग्रस्त फांद्या काढून बागेची साफसफाई करावी आणि नंतर

कीटकनाशकाची फवारणी करण्यात यावी.

आंबा, काजू

अवस्था ः वाढीची अवस्था

-आंबा आणि काजू झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव खोड आणि उघडी मुळे यावर दिसून येण्याची शक्यता असते. त्यासाठी खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडकीड झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुस्सा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुस्सा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावे. खोडाची प्रादुर्भावग्रस्त साल काढून तारेच्या हुकाने कीड बाहेर काढून मारून टाकावी.

क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही ) ५ मि. लि. प्रति लिटर पाणी या द्रावणाने साल काढलेला भाग चांगला भिजवावा. किंवा क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) १० मि. लि. अधिक ५० मि.लि. रॉकेल* द्रावण छिद्रामध्ये ओतावे. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. इजा झाल्यास तिथे त्वरित बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. झाडाची मुळे उघडी राहणार नाही याची काळजी घ्यावी. बागेतील नियमित गवत काढून साफसफाई करावी. वाळलेल्या फांद्या कापलेल्या भागावर डांबर लावावे. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.

नारळ

अवस्था ः वाढीची ते फळधारणा

- नारळ बागेमधील किडीच्या नियंत्रणासाठी मृत माडाची खोडे काढून नष्ट करावीत.

-पालापाचोळा गोळा करून बागेत स्वच्छता राखावी.

-नारळावर रुगोज चक्राकार पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खालील बाजूस राहून रस शोषतात. पानांवर रुगोज चक्राकार माशीचे पांढरे मेणचट तंतू दिसून येतात. माशी गोड चिकट स्त्राव सोडत असल्याने त्यावर वातावरणातील बुरशीची वाढ होते. पाने काळी पडलेली दिसतात. किडीच्या प्रादुर्भावासाठी बागेचे नेहमी निरीक्षण करावे.

किडीच्या व्यवस्थापनासाठी, माडावर निम तेल** (०.५ टक्के) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. त्यानंतर १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या तीन फवारण्या प्रेशर पंपाच्या साहाय्याने कराव्यात. यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होऊन किडीच्या व्यवस्थापनास मदत होईल.

(टीप: * लेबल क्लेम नाहीत, ॲग्रेस्को शिफारस आहे. ** संशोधन निष्कर्ष.)

संपर्क ः ०२३५८ - २८२३८७/ ८१४९४६७४०१

(ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com