Kharif Sowing : शिंदखेडा तालुक्यात ८५ टक्के पेरा

Kharif Season 2023 : जुलैचा पंधरवडा संपत आला तरीदेखील शिंदखेडा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाचा १५ टक्के पेरा अद्याप अपूर्ण आहे.
Sowing
SowingAgrowon

Kharif Sowing Maharashtra : जुलैचा पंधरवडा संपत आला तरीदेखील शिंदखेडा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाचा १५ टक्के पेरा अद्याप अपूर्ण आहे. तालुक्यामध्ये ८० टक्क्यांच्या आत पाऊस झालेला आहे.

तालुक्यात गुरुवार (ता. १३)अखेर सरासरी १८० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र फक्त १४३ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. कपाशीचे क्षेत्र नऊ हजार १६२ हेक्टरनी कमी झाले आहे.

तालुक्यात काही भागांत गेल्या आठवड्यात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झालेला आहे.

Sowing
Kharif Sowing : मुगाची सोळा टक्के, उडदाची १४ टक्के पेरणी

एकूण ९९ हजार ७५४ हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी लायक असून, आजपर्यंत ७४ हजार २८७ हेक्टरवर पेरा पूर्ण झाला आहे. म्हणजे ८५ टक्के पेरणी पूर्ण झाल्या असून, अजून जवळपास १५ टक्के पेरा बाकी आहे. यंदा कपाशीचे क्षेत्र कमी झाले असून, मका, ज्वारी व बाजरी पिकाचा पेरा वाढला आहे.

तालुक्यात पावसाची चिंताजनक वाटचाल बघता पंतप्रधान पीकविमा योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी घाई करीत आहेत. १२ जुलैअखेर १४ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. सुमारे ५० हजार शेतकरी ३१ जुलैपर्यंत अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

Sowing
Sowing Policy : मागणी आणि पुरवठ्यानुसार शेतीमाल लागवड धोरण हवे

खरीप हंगाम २०२३-२४ पीकपेरणी लक्ष्यांक/सद्यःस्थिती (हेक्टरमध्ये)

पीक सरासरी

क्षेत्र चालू वर्षाचा पेरा

ज्वारी १४५५ ८३८

बाजरी ९५०० ६०४०

मका ९४४५ ५९७५

इतर तृणधान्य ११० २९

तूर ७५० ३१०

मूग ४५०० २०२६

उडीद ५५४ २८१

इतर कडधान्ये १०० २३

भुईमूग १३०२ ६९३

सोयाबीन ३५ १९४

तीळ ६० ३४

इतर गळीत धान्य ७४ ०६

बागायत/जिरायत कपाशी ७१५०० ५७८३८

ऊस ३६९ ०००

एकूण ९९,७५४ ७४,२८७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com