Kharif Sowing : मुगाची सोळा टक्के, उडदाची १४ टक्के पेरणी

Moong Urad Sowing : एकतर उशिराने पाऊस सुरू झाला. त्यात अजूनही अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस नसल्याने राज्यात यंदा मूग, उडदाची कमी पेरणी होत आहे.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon

Nagar News : एकतर उशिराने पाऊस सुरू झाला. त्यात अजूनही अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस नसल्याने राज्यात यंदा मूग, उडदाची कमी पेरणी होत आहे. आतापर्यंत मुगाची सरासरीच्या १६ टक्के, तर उडदाची १४ टक्के पेरणी झाली आहे.

साधारण २५ जूनपर्यंत व उशिरा ७ जुलैपर्यंत मूग, उडदाची पेरणी करणे कृषी विभागाला अपेक्षित असते. त्यामुळे आता मूग उडदाच्या क्षेत्रात फारशी वाढ होणार आहे. अशी शक्यता कमी झाल्याने मूग, उडदाचे क्षेत्र कमालीचे घटण्याची शक्यता आहे.

राज्यात खरिपाचे खरिपाचे १ कोटी ५२ लाख ९७ हजार ३९४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यात उडदाचे ३ लाख ७० हजार २५२ हेक्टर, तर मुगाचे ३ लाख ९३ हजार ९५७ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.

खरिपात बहुतांश जिल्ह्यात मूग, उडदाची पेरणी केली जात असली, तरी नाशिक, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, सोलापूर जिल्ह्यांत मुगाचे, तर जळगाव, नगर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, बुलडाणा, वाशीम, अमरावती या जिल्ह्यांत प्रामुख्याने उडदाचे क्षेत्र अधिक असते.

Kharif Sowing
Urad Import: उडदाच्या आयातीत मोठी वाढ; दर नरमतील का?

राज्यात आतापर्यंत मुगाची ६४ हजार ४०८ हेक्टर, तर उडदाची ५२ हजार ७७८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी मुगाची आतापर्यंत सरासरीच्या ५४ टक्के म्हणजे २ लाख ९ हजार हेक्टरवर, तर उडदाची सरासरीच्या ६६ टक्के म्हणजे २ लाख ४५ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.

Kharif Sowing
Moong Urad Sowing : मूग, उडदाच्या लागवडीला फटका

बहुतांश भागात पेरण्या रखडलेल्या

यंदा मूग, उडदाची पेरणी होणाऱ्या बहुतांश भागात अजूनही पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. पेरणीचा कालावधी आता संपल्यात जमा आहे. त्यामुळे आता फारसे क्षेत्र वाढण्याची शक्यता नाही. त्या जागी कापूस, सोयाबीनला प्राधान्य दिले जात असल्याची स्थिती आहे.

जिल्हानिहाय मुगाची पेरणी (कंसात उडीद पेरणी क्षेत्र) (हेक्टर)

ठाणे ः ९ (२२), पालघर ः ० (४८३), नाशिक ः ९१३१ (२९९), धुळे ः ४९० (६८), नंदुरबार ः १२२ (८९५), जळगाव ः ४३१२ (४३३९), नगर ः ६२४९ (५९०९), पुणे ः ४०८ (१४८), सोलापूर १६९२ (९६२९), सातारा ः २६२५ (२२१), सांगली ः ७४ (४७५), कोल्हापूर ः ९८ (७५), छत्रपती संभाजीनगर ः ५१८५ (१५०८),

जालना ः ५४८५ (२८५२), बीड ः १७,६२ (२८,४७) लातूर ः १९५७ (१२९९), धाराशिव ः ११३७ (५६४८), नांदेड ः ७८४० (७४५२), परभणी ः ६५९३ (७८३), हिंगोली ः २९७८ (१९९४),

बुलडाणा ः १५६३ (१७४८), अकोला ः ७२४ (५५३), वाशीम ः ३३२ (३७८), अमरावती ः २२५ (१२३), यवतमाळ ः ३११८ (२७९०), वर्धा ः ९४ (७२), नागपूर ः १०३ (९८), चंद्रपूर ः ९९ (७५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com