Satara Dam Water Storage : सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांत ८१ टक्के पाणीसाठा

Satara Dam Water Level : सप्टेंबर महिन्यात धरण भरून पाणी सोडले, मात्र अजूनही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत.
Dam Water
Dam WaterAgrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्ह्यातील पाऊस गायब झाल्याने प्रमुख धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. सप्टेंबर महिन्यात धरण भरून पाणी सोडले, मात्र अजूनही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. सिंचनासाठी धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी या प्रमुख धरणांतून २२५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

खरिपाच्या सुरुवातीपासून अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्याच्या इतर भागांत पाऊस कमी झाला असला, तरी प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे.

Dam Water
Water Crisis : माजलगाव धरणाची पाणीपातळी साडेबारा टक्क्यांवर

जिल्ह्यात सहा प्रमुख धरणांत ८१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यामध्ये कोयना धरण ८३.७४ टीएमसी म्हणजेच ८३.६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धोम धरणात ८.६६, धोम-बलकवडी ३.८५. कण्हेर ७.७४, उरमोडी ५.२६, तारळी ५.५३ असा एकूण ११४.७८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

Dam Water
Water Crisis : आटपाडी तालुक्यात पाणीउपसा बंदी

मात्र गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील पाऊस गायब झालेला आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक बंद झाली आहे. पाऊस नसल्याने सिंचनासाठी धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी या चार प्रमुख धरणांतून २२५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यांत होणाऱ्या जोरदार पावसामुळे सप्टेंबर महिन्यात पाण्याच्या विसर्ग धरण व्यवस्थापनाला करावा. मात्र या वेळी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना धरणाचे अजूनही दरवाजातून पाणी सोडलेले नाही. धरणे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पावसाची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com