Yeldari Dam Water Storage : येलदरी धरणात ५९.६३ टक्के जिवंत पाणीसाठा

Dam Water Storage : येलदरी धरण क्षेत्रात यंदा १ जून पासून एकूण ३८३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी याच तारखेला ४७० मिलिमीटर पाऊस झाला होता.
Yeldari Dam
Yeldari DamAgrowon

Parbhani News : परभणी-हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या पूर्णा नदीवरील येलदरी धरणातील पाणीसाठ्यात यंदाच्या १८ जून रोजीच्या ४३३.१६९ एमएमक्युब (५६.५१ टक्के) च्या तुलेत ४९.१६९ एमएमक्युबने वाढ झाली आहे.

रविवारी (ता. ३०) येलदरी धरणामध्ये ४८२.९१३ एमएमक्युब (५९.६३) टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाला होता. गतवर्षी (२०२२) याच तारखेला या धरणात ५४७.१४९ एमएमक्युब पाणीसाठा होता. यंदा धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यातील वाढ हळू होत आहे.

येलदरी धरण क्षेत्रात यंदा १ जून पासून एकूण ३८३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी याच तारखेला ४७० मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा १ जून पासून एकूण ३३२ एमएमक्युब पाण्याचा येवा झाला आहे. सिद्धेश्वर धरणामध्ये रविवारी (ता. ३०) एकूण ३०.९३० एमएमक्युब (३८.२० टक्के) जिवंत पाणीसाठा होता.

Yeldari Dam
Dam Water Level : धरणांत ३० टीएमसी पाण्याची आवक

गतवर्षीयाच तारखेला ५३.७१६ एमएमक्युब पाणीसाठा होता. यंदा१ जून पासून धरणक्षेत्रात एकूण ४२० मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षीच्या ६२० मिलीमीटरच्या तुलनेत २०० मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पात रविवारी २७.८७ टक्के जिवंत पाणीसाठा होता.

Yeldari Dam
Ujani Dam Water Storage : उजनी धरण उद्या ‘प्लस’मध्ये येणार

गतवर्षी याच तारखेलाया धरणात ७०.८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. या धरणाच्या क्षेत्रात यंदा १ जून पासून एकूण २५३ मिलिमीटर पाऊस झाला. गतवर्षी ४४३ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा एकूण १०.३८६ दलघमी पाण्याचा येवा झाला आहे.

रविवारी (ता.३०)सकाळी जायकवाडी धरणामध्ये ३०.९३ टक्के तर माजलगाव धरणामध्ये १६.२८ टक्के जिवंत पाणीसाठा होता. गतवर्षी याचदिवशी जायकवाडी धरणामध्ये ९०.१३टक्के तर माजलगाव धरणामध्ये ४३.११ टक्के जिवंत पाणीसाठा जमा झाला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com