Ujani Dam
Ujani DamAgrowon

Ujani Dam Water Storage : उजनी धरण उद्या ‘प्लस’मध्ये येणार

Ujani Water Capacity : उजनी आता उणे ५.६३ टक्क्यावर आले आहे. वरून येणारा विसर्ग चांगला असल्याने मंगळवारी (ता. १) धरण प्लसमध्ये येईल, असा विश्वास लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.
Published on

Solapur News : लोणावळा, भीमाशंकर खोरे परिसरात चांगला पाऊस झाला आहे. खडकवासला धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे उजनी धरणात सध्या १२ हजार ४०० क्युसेकने पाणी येत आहे. उजनी आता उणे ५.६३ टक्क्यावर आले आहे. वरून येणारा विसर्ग चांगला असल्याने मंगळवारी (ता. १) धरण प्लसमध्ये येईल, असा विश्वास लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरण काठोकाठ भरले आहे. आता धरणात येणारे पाणी खाली सोडून दिले जात आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्यावर उजनी धरणात येणारा विसर्ग वाढतो आणि आपल्याकडे कमी पाऊस झाला, तरी धरण १०० टक्के भरते. आता चासकमान, वडिवळे आणि कासारसाई या धरणांमधील पाणी उजनीत येत आहे.

Ujani Dam
Ujani Dam : ‘उजनी’तील गाळ, वाळूच्या माणाबाबत होणार सर्व्हेक्षण

त्यामुळे शनिवारी सकाळी उणे ८.६९ टक्के असलेले उजनी धरण रात्री उशिरापर्यंत सहा टक्क्यावर आले होते. सध्या दौंडमधून उजनीत १२ हजारांवर विसर्ग सुरूच आहे. मागील २० दिवसात धरणात १५ टीएमसी पाणी आले आहे. पावसाळा सुरू होऊनही ९ जुलैला धरण उणे ३६ टक्के होते. १२ जुलैपासून लोणावळा, भीमाशंकर खोरे आणि खडकवासला धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आणि पाणी टंचाईची चिंता मिटली.

Ujani Dam
Ujani Dam : नियोजनाअभावी ‘उजनी’ उणे ३४ टक्क्यांवर

उजनी धरणात ६० टीएमसी पाणी

उजनीचा मृत साठा ६३.६५ टीएमसी आहे. तर जिवंत पाणीसाठा ५३.५७ टीएमसी आहे. मागच्या वर्षी ७ मे रोजी धरण उणे झाले होते. २०२२ च्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात एक महिना अगोदरच धरण उणे झाले होते.

त्यामुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दुबार पंपिंग करण्याची वेळ येणार, असे बोलले जात होते. पण तो धोका आता दूर झाला आहे. दरम्यान, धरणात सध्या एकूण ६० टीएमसी पाणी आहे. आता दौंड व बंडगार्डन येथून येणारा विसर्ग वाढल्यास काही दिवसांत धरण भरू शकते.

नदी काठावरील लोकांची सुरक्षितता महत्त्वाची...

पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. तेथील धरणे आता १०० टक्क्यांकडे वाटचाल करू लागली आहेत. त्या वेळी वरून उजनी धरणात येणारा विसर्ग मोठा असणार आहे. त्यामुळे उजनी काही दिवसांत काठोकाठ भरते.

त्या वेळी अचानक भीमा नदी काठावरील लोकांना सतर्क राहा, अशा सूचना दिल्या जातात. तरीदेखील दरवर्षी अनेक जण पुरात अडकतात, हा अनुभव आहे. या पार्श्‍वभूमीवर उजनी ६० टक्के भरल्यावर पावसाचा अंदाज घेऊन त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे जरुरी असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com