Z.P. School : जिल्ह्यात ५८ शाळा होणार स्मार्ट

या वर्षी तब्बल सव्वाआठशे वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. पुरेसा निधी मिळत नसल्याने हा प्रश्न निकाली निघत नाही. परिणामी, अध्ययनावर परिणाम होतो.
Z.P. School
Z.P. School Agrowon

नगर ः जिल्हा परिषद (Z.P. School) शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा वर्गखोल्या नाहीत. बहुतांश ठिकाणी वर्ग उघड्यावर भरतात. ७५ वर्ग निर्लेखन झाल्याने कमी झाले. यावर्षी तब्बल सव्वाआठशे वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. पुरेसा निधी मिळत नसल्याने हा प्रश्न निकाली निघत नाही. परिणामी, अध्ययनावर परिणाम होतो. यावर तोडगा काढण्यासाठी शाळा बीओटीवर बांधण्याचा विचार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाची तयारी सुरू आहे.

Z.P. School
Crop Insurance : सबुरी नको, कारवाई हवी

प्राथमिक स्तरावर ५८ शाळांची माहिती मागवली आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील ५८ शाळा निवडल्या आहेत. त्यात जिल्ह्याच्या दक्षिण भागातील २५, तर उत्तर भागातील ३३ शाळांची निवड केली आहे. सहजासहजी त्या जागांवर वर्ग विकसित केले जाऊ शकतील, अशा शाळा निवडल्या आहेत. बीओटीतून शाळा बांधल्यास विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. तसेच शासनावरील आर्थिक ताणही हलका होण्यास मदत होईल.

कोणत्या शाळा?

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा लोकल बोर्डाच्या नावावर असलेल्या शाळांना पसंती देण्यात आली आहे. दक्षिण विभागात कर्जतमधील प्राथमिक शाळा, मिरजगाव, राशीन येथील मुला-मुलींच्या शाळांचा त्यात समावेश आहे. श्रीगोंद्यात शहरातील व हंगेवाडी, शेवगावात शहर व चापडगाव, घोटण, जामखेड शह व हळगाव, पाथर्डी व तिसगाव, पारनेर मुले-मुली, नगरमध्ये जेऊर व केडगाव.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com