Crop Loan : बुलडाणा जिल्ह्यात खरिपासाठी ५१ टक्के पीककर्ज वितरित

Kharif Season : खरीप हंगामासाठी १४७० कोटींचे नियोजन करणाऱ्या बँकांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पीककर्ज वाटप करताना यापैकी केवळ ५१ टक्के निधीच वितरित केला आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on: 
Updated on: 

Buldana News : खरीप हंगामासाठी १४७० कोटींचे नियोजन करणाऱ्या बँकांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पीककर्ज वाटप करताना यापैकी केवळ ५१ टक्के निधीच वितरित केला आहे. जून अखेर खरीप पीककर्ज वाटपाचा टक्का अत्यंत कमी राहिल्याने बँकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्याला पीककर्ज देण्याच्या उद्देशाने यंदा १४७० कोटींचा लक्ष्यांक निर्धारित करण्यात आला होता. एक एप्रिलपासून शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाला प्रारंभही करण्यात आला. खरीप हंगामात बी-बियाणे, खतांसह मशागतीच्या कामांसाठी हा पैसा वेळेवर कामात पडणे गरजेचे असते.

Crop Loan
Crop Loan : सांगली जिल्हा बँकेचे खरिपासाठी ५७१ कोटींचे कर्जवाटप

पावसाअभावी यंदा पेरण्यांना सार्वत्रिक सुरुवात झालेली नाही. परंतु बँकांनी पीककर्ज वाटपात आखडता हात घेतल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पैसेही मिळू शकलेले नाहीत. यावर्षी थकीत खातेदारांचाही प्रश्न गंभीर बनलेला आहे.

शेतकऱ्यांनी जुने कर्ज भरून नवीन कर्जासाठी अर्ज करणे गरजेचे होते. गेल्या वर्षात झालेल्या नुकसानामुळे अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज भरता आलेले नाही. त्याचाही फटका पीककर्ज वाटपाला बसला.

Crop Loan
Crop Loan Recovery : खानदेशात बँकांकडून पीक कर्जवसुलीची सक्ती

पीककर्ज वाटपात काही राष्ट्रीयकृत बँकांनी सर्वाधिक हात आखडता घेतला. यात प्रामुख्याने पंजाब नॅशनल बँकेने अवघे तीन टक्के पीककर्ज वाटप केल्याचे दिसून येते. या बँकेला १००० खातेदारांना पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३६ खातेदारांना बँकेने पीककर्ज वाटपाची कामगिरी बजावली आहे.

जिल्ह्यात सर्वात निचांकी पीक वाटपात ही बँक अग्रस्थानी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकां मिळून ४८ हजार ५७३ शेतकऱ्यांना ४९९ कोटींचे पीककर्ज मिळाले. खासगी बँकांनी १५ हजार ९३१ शेतकऱ्यांना १८२ कोटी वितरित केले. तर ग्रामीण बँकेने १८२ कोटी आणि जिल्हा बँकेने ४४ कोटींचे वितरण केले.

पीककर्ज वाटपाचा तपशील

एकूण लक्ष्यांक १४७० कोटी

शेतकरी संख्या १ लाख ५३ हजार

झालेला वाटप ७४७ कोटी

शेतकरी संख्या ७१ हजार ४३५

टक्केवारी ५१ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.