Crop Loan
Crop LoanAgrowon

Crop Loan : सांगली जिल्हा बँकेचे खरिपासाठी ५७१ कोटींचे कर्जवाटप

Kharif Crop Loan : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असताना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते.
Published on

Sangli News : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असताना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून खरिपाच्या पेरणीसाठी ७३ हजार ८५ शेतकऱ्यांना ५७१ कोटी नऊ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले, असल्याची माहिती अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. आतापर्यंत उद्दिष्टाच्या ६० टक्के कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू असून, दहा ते पंधरा टक्क्यांनी कर्ज वाढणार आहे.

Crop Loan
Crop Loan : पीककर्ज वाटपात बँकांचे आडमुठे धोरण

खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षांत खरीप हंगामाचे पिकांखालील सरासरी क्षेत्र ३ लाख ५१ हजार हेक्टर असून, यंदा २ लाख ७१ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. यंदा पावसाने दडी मारली असली, तरी खरीप हंगामाची शेतकऱ्यांकडून तयारी झाली आहे.

Crop Loan
Crop Loan : अकोल्यातही पीककर्जाचा लक्ष्यांक अपूर्णच

प्रामुख्याने ऊस, सोयाबीन, तूर पिकांना शेतकऱ्यांची पसंती आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने पेरण्यांना वेग येईल, असे चित्र आहे. हंगामासाठी शेतकऱ्यांकडून पीककर्जाची मागणी होऊ लागली आहे. राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पीककर्जाची मागणी होत आहे. मात्र जिल्हा बँकेकडून खरिपाहंगामासाठी कर्जवाटप केले जाते.

शेतकऱ्यांना वेळेत कर्ज न मिळाल्यास बियाणे, खत खरेदीसाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा बँकेने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला हंगामासाठी ६३४ कोटी १२ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com