Lasalgaon Market : लासलगावात कोथिंबिरीच्या जुडीला ५१ पैसे भाव

Kothimbir Bazar Bhav : मागील महिन्यात बाजारात कोथिंबिरीची आवक कमी असल्यामुळे दरात तेजी होती. मात्र हळूहळू आवक वाढत गेल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला.
Coriander
CorianderAgrowon

Nashik News : मागील महिन्यात बाजारात कोथिंबिरीची आवक कमी असल्यामुळे दरात तेजी होती. मात्र हळूहळू आवक वाढत गेल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला. काही दिवसांपूर्वी तेजीत असलेली कोथिंबिरीची जुडी लासलगाव बाजार समितीत अवघ्या ५१ पैशांना पुकारल्याने शेतकऱ्याने विकण्यापेक्षा ती जनावरांना टाकून संताप व्यक्त केला.

Coriander
Kothambir Market : कोथिंबिरीचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत

जुलैमध्ये सुरुवातीला कोथिंबिरीची जुडी २२ रुपयांप्रमाणे विकली गेली होती. आवक फक्त ४१० जुड्या होती. दिवसेंदिवस आवक वाढत असल्याने अत्यंत कमी दर मिळत आहे. चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर आहेर यांनी कोथिंबिरीची लागवड केली होती, कमी पावसाचा परिणाम म्हणून उशिराने कोथिंबीर शेतात तयार झाली.

Coriander
Lasalgaon APMC : बाजार समिती सभापतींनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

शुक्रवारी (ता. ४) त्यांनी ती लासलगाव बाजार समितीत लिलावासाठी ट्रॅक्टरमधून आणली, मात्र आवक जास्त असल्याने त्यांच्या कोथिंबिरीला केवळ ५१ पैसे प्रतिजुडी अशी बोली व्यापाऱ्यांनी लावली. ५०० जोडी त्यांनी विक्रीसाठी आणली होती, मात्र पुकारलेल्या भावात त्यांना संपूर्ण कोथिंबीर विक्रीतून २५५ रुपये मिळाले असते.

या पैशापेक्षा बाजार समितीमध्ये ट्रॅक्टर आणण्यासाठी डिझेलचा खर्च जास्त झाला. त्यामुळे विकण्यापेक्षा ती त्यांनी जनावारांसाठी खाद्य म्हणून टाकून दिली. कोथिंबीर शेतातून काढण्यासाठी ३०० रुपयांची मजुरी लागल्याचे ते हताशपणे सांगत होते. आता उरलेली कोथिंबीर पुन्हा विक्रीला आणून वाहतुकीसाठी खर्च करायचा नाही. काढणीसाठी मजुरी वाया जाऊ द्यायची नाही असा पवित्रा घेत त्यांनी ती स्थानिक स्तरावर विकण्याचा निर्णय घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com