Kothambir Market : कोथिंबिरीचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत

Coriander Rate : कोथिंबिरीची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले आहेत. लौकी (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्याने नारायणगाव (ता. जुन्नर) येथील बाजार समितीत आणलेल्या कोथिंबिरीला ५० पैसे प्रति जुडी बाजारभाव मिळाला.
Coriendar
CoriendarAgrowon
Published on
Updated on

Pune News : कोथिंबिरीची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले आहेत. लौकी (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्याने नारायणगाव (ता. जुन्नर) येथील बाजार समितीत आणलेल्या कोथिंबिरीला ५० पैसे प्रति जुडी बाजारभाव मिळाला. या कोसळलेल्या बाजारभावामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत.

Coriendar
मार्केट शेतकऱ्यांसाठी आहे अन् इथंच कोथिंबीर विकणार!

कोथिंबिरीला एक ते दीड महिन्यापूर्वी २० ते ३० रुपये जुडीला बाजारभाव होता. त्यामुळे तालुक्यातील लौकी, चास, साकोरे, महाळुंगे पडवळ, नांदूर, कळंब, चांडोली बुद्रुक, विठ्ठलवाडी, वडगाव काशिंबेग, सुलतानपूर, थोरांदळे, जवळे, निरगुडसर आदी ४० गावांतील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पैसे मिळवून देणाऱ्या कोथिंबिरीची लागवड केली.

Coriendar
Coriander Market : कोथिंबीर बेभाव; शेतकऱ्याने फिरविला पिकावर रोटाव्हेटर

नारायणगाव बाजार समितीच्या आवारात शेतकरी कोथिंबिरीची विक्री करत आहेत. सध्या कवडीमोल बाजारभावाने विक्री होत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कोथिंबिरीची लागवड केली. परिणामतः उत्पादन वाढल्याने आवक वाढली. त्या प्रमाणात मुंबई, पुणे व अन्य बाजारपेठांतून कोथिंबिरीला मागणी नाही. त्यामुळे बाजारभाव कोसळल्याची माहिती अडत्यांनी दिली.साडेतीन एकर क्षेत्रात कोथिंबिरीची लागवड केली होती. त्यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके व मजूर, असा एकूण ७५ हजार रुपये खर्च झाला. नारायणगाव येथील बाजार समितीच्या आवारात १ हजार ३५० जुड्या विक्रीसाठी नेल्या होत्या. प्रति जुडी ५० पैसे बाजारभाव मिळाला. ६७५ रुपये मिळाले. मजुरी, वाहतूक व अन्य असा एकूण ५ हजार रुपये खर्च झाला. उत्पादन खर्चही भागत नसल्याने कोथिंबिरीची काढणी थांबविली. निराश होऊन पिकावर तणनाशकाची फवारणी करून शेत मोकळे करण्याचा निर्णय घेतला आहे.
- संदीप लक्ष्मण काळे, शेतकरी, लौकी, ता. आंबेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com