Lasalgaon APMC : बाजार समिती सभापतींनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

Livestock Market : अमरावती बाजार समितीअंतर्गत बडनेरा येथे दर शुक्रवारी (ता. १६) गुरांचा बाजार भरतो. जातिवंत मुऱ्हा म्हशींची या ठिकाणी मोठी उलाढाल होते.
Amravati News
Amravati News Agrowon
Published on
Updated on

Amravati News : महिनाभरापूर्वीच बाजार समितीचा प्रभार स्वीकारल्यानंतर ॲक्‍शन मोडमध्ये आलेल्या सभापती हरीश मोरे यांनी शुक्रवारी (ता. १६) बडनेरा परिसरात भरणाऱ्या गुरांच्या बाजाराची पाहणी करून व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या समस्यांचे लवकरच निराकरण करण्याचे काम होईल, असा विश्‍वास त्यांनी दिला. बाजार समिती प्रशासनाकडून अशा प्रकारे पहिल्यांदाच दखल घेण्यात आल्याने व्यापारी, शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्‍त केले.

अमरावती बाजार समितीअंतर्गत बडनेरा येथे दर शुक्रवारी (ता. १६) गुरांचा बाजार भरतो. जातिवंत मुऱ्हा म्हशींची या ठिकाणी मोठी उलाढाल होते. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून म्हशी या बाजारात आणल्या जातात. दर आठवड्याला शेकडो म्हशींची खरेदी- विक्री होते. लाखो रुपयांचा महसूल या माध्यमातून बाजार समितीला मिळतो.

Amravati News
Amravati Water Storage : अमरावती जिल्ह्यात ४४ टक्के जलसाठा

परिणामी, या बाजार समितीमध्ये पायाभूत सुविधा देण्यासाठी पहिल्यांदाच बाजार समिती सभापती हरीश मोरे यांच्या पुढाकारातून प्रयत्न केला जात आहे. शुक्रवारी सभापती हरीश मोरे, संचालक प्रताप भुयार, किशोर चांगोले, सचिव दीपक विजयकर यांनी बाजार समिती परिसराला भेट दिली.

Amravati News
Amravati News : टाकरखेड्यातील महिलांचा निसर्गसंवर्धनाचा वसा

या वेळी शेतकरी, व्यापारी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. बाजार समितीत सध्या जनावरांना उतरविण्यासाठी रॅम्पची पर्याप्त सुविधा नाही. जनावरांना बांधण्यासाठी दावण, शेड नसल्याने उन्हाळ्यात जनावरांना त्रास होतो.

पिण्याच्या पाण्याचे टाके, अशा समस्या मांडण्यात आल्या. येत्या काही महिन्यांतच या समस्यांची सोडवणूक केली जाईल, असा विश्‍वास सभापती हरीश मोरे यांनी या वेळी व्यक्‍त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com