
Washim News : जिल्हा परिषदेअंतर्गत गट क संवर्गाची विविध १८ प्रकारची पदे भरण्यात येणार आहेत. वाहनचालक व गट ड संवर्गाची पदे वगळून यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) आरोग्य सेविका( महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ साहाय्यक, वरिष्ठ साहाय्यक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक उच्चश्रेणी, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), तसेच स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक अशी मिळून २४२ पदे भरली जाणार आहेत.
जिल्हा परिषदेची ही पदे भरण्याबाबत शैक्षणिक अर्हता, अनुभव, वेतनश्रेणी, परीक्षेचे स्वरूप, वयोमर्यादा, सामाजिक, समांतर व सर्व प्रकारचे आरक्षण, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, अनाथ, दिव्यांग, फॉर्म भरण्याची पद्धत व मुदत तसेच आवश्यक कागदपत्रे, फॉर्म भरण्यासाठी लागणारी फी व पद्धती आदी सर्व माहिती वाशीम जिल्हा परिषदेच्या www.zpwashim.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी व परीक्षा प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास http:// www.cgrs.ibps.in/ या लिंकवर अथवा १८००२२२३६६/१८००१०३४५६६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा व उमेदवारास जाहिरातीमध्ये काही समस्या उद्भवल्यास जिल्हा परिषद, वाशीमचा भ्रमणध्वनी क्र. ०७२५२-२३२८६२ या हेल्पलाईनवर सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यत संपर्क साधावा.
ऑनलाइन अर्जाव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, अशी माहिती जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी. एस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांनी दिली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.