Police Recruitment : कंत्राटाच्या कुरणासाठीच कंत्राटी पोलिस भरतीचा घाट; विधान परिषदेत विरोधकांची चौकशीची मागणी

Contractual Recruitment : मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. विधान परिषदेमध्ये विरोधकांनी सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला.
Police Recruitment
Police RecruitmentAgrowon
Published on
Updated on

Monsoon Session 2023 : मुंबई पोलिस दलात कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती करण्याच्या धोरणाविरोधात विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले. कंत्राटी पोलिसांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल. असा धोका व्यक्त करतानाच कंत्राटाचे कुरण निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचा निर्णय केला जात आहे, असा आरोप विरोधकांनी विधान परिषदेत मंगळवारी (ता. २५) केला.

Police Recruitment
Police Bharti News : अन् एकाचवेळी शेतकरी नवऱ्यासोबत कारभारीणही झाली पोलीस भरती

मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पद्धतीने पोलिस भरतीला गृह विभागाने मंजुरी दिली आहे. या विरोधात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे भाई जगताप यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. कंत्राटी पोलिस भरतीचा हा निर्णय धोकादायक आहे. तो त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली. पोलिस हे सरकारच्या अखत्यारीतच असले पाहिजेत, अशी भूमिका मांडत अंबादास दानवे यांनी कंत्राटी पोलिस भरतीला कडाडून विरोध केला.

Police Recruitment
Govt Jobs : १० वी, १२ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!, पशुसंवर्धन विभागात ३ हजार ४४४ पदांसाठी भरती

भाई जगताप यांनीही कंत्राटी पोलिस भरतीला विरोध केला. पोलिसांची जरब असते. मात्र ११ महिन्यांसाठी कंत्राटावर घेतलेल्या पोलिसांची कसली जरब असणार आहे, असा सवाल जगताप यांनी केला.

काही महिन्यांपूर्वी मरोळ येथे पोलिस भरतीची परीक्षा झाली. जवळपास ३० हजार युवकांनी या भरतीसाठी लेखी, मैदानी परीक्षा दिली. भर उन्हात, कोणतीही सुविधा नसतानाही विद्यार्थी या भरतीसाठी आले होते. त्या परीक्षेचे काय झाले, असा प्रश्‍न असतानाच कंत्राटी पोलिस भरतीचा घाट घालण्यात आला आहे. सैन्य कंत्राटी, पोलिस कंत्राटी आणि सरकार कंत्राटदार अशी स्थिती निर्माण झाली आहे. कंत्राटी पोलिस भरतीचे कंत्राट देऊन कुरण तयार करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही भाई जगताप यांनी केला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या मुद्द्यावर सरकारला निवेदन देण्याचे निर्देश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com