Talathi Recruitment : साडेदहा लाख उमेदवार तलाठी होण्यासाठी इच्छुक

Talathi Bharti 2023 : साडेचार हजार जागांसाठी विक्रमी अर्ज
Talathi Bharati 2023
Talathi Bharati 2023agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Department of Revenue : पुणे ः राज्यात होत असलेल्या तलाठी भरतीला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. तलाठ्याच्या साडेचार हजारांहून अधिक जागांसाठी साडेदहा लाख उमेदवार परीक्षा देत आहेत. विशेष म्हणजे बहुतेक उमेदवार ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आहेत.

तलाठी पद महसूल विभागाच्या अखत्यारित येते. परंतु परीक्षा घेण्याची जबाबदारी राज्य शासनाने महसूल विभागाकडे न ठेवता टीसीएस कंपनीला दिली आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. त्यात सुरक्षितता व पारदर्शकता राहण्यासाठी टीसीएस कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी सर्व रूपरेषा निश्‍चित करीत आहेत. तलाठी पदाच्या एकूण चार हजार ६४४ रिक्त पदांसाठी ही परीक्षा होत आहे. त्यासाठी १२ लाख उमेदवारांनी नावनोंदणी केली होती. प्रत्यक्षात दहा लाख ६६ हजार उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले आहे. त्यामुळे शुल्क भरणारे उमेदवार परीक्षा देतील हे गृहीत धरून राज्यभर तयारी केली जात आहे.

परीक्षार्थींची संख्या दहा लाखांच्या पुढे गेल्यामुळे या परीक्षेबाबत स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कमालीची उत्सुकता आहे. दुसरीकडे राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर बसविण्याचे बंधन टीसीएस कंपनीवर टाकण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या आवारात पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्याबाबत काळजी घेण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी राज्य शासनाला एक पत्र लिहून राज्यातील तीन परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तविली आहे. परंतु शासनाने हा मुद्दा तत्काळ स्वीकारलेला नाही. “संघटनेच्या आक्षेपांना आम्ही उत्तर देणारे पत्र पाठविले आहे. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याबद्दल न्यायालयीन दावा किंवा पोलिसांकडील काही पुरावे असल्यास ते सादर करावेत, असे संघटनेला सूचित करण्यात आले आहे. राज्यभर ही परीक्षा होत आहे. त्यामुळे मोघम कोणत्याही केंद्रांबाबत आक्षेप स्वीकारता येणार नाही. पोलिसांकडून काही पुरावे आल्यास निश्‍चित दखल घेतली जाईल,” असे भूमी अभिलेख विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Talathi Bharati 2023
Talathi Recruitment : ३११० तलाठी, ५१८ मंडल अधिकारी पदांना मान्यता

परीक्षेच्या दहा दिवस अगोदर प्रवेशपत्र
परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षेबाबत कामकाज होण्याची शक्यता आहे. सध्या टीसीएस कंपनीकडून सर्व अर्जांची छाननी केली जात आहे. उमेदवारांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेच्या किमान दहा दिवस अगोदर परीक्षाप्रवेश पत्र वाटप होण्याचा अंदाज आहे.

तलाठी भरतीसाठी उच्चांकी अर्ज आले आहेत. ग्रामीण भागातील उमेदवारांना सरकारी नोकरी अधिक सुरक्षित वाटत असल्याचे यातून दिसते. ही भरती पारदर्शक होण्यासाठी राज्य शासनाने कमालीची दक्षता घेतली आहे. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्यास कारवाईचे अधिकार जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व जिल्हा पोलिस प्रमुखांना दिले आहेत.
- आनंद रायते, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त, भूमी अभिलेख विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com