
Chhatrapati Sambhajinagar : बँकांनी या वर्षी गेल्या वेळेच्या तुलनेने विविध विषयाशी संबंधित ७ हजार १६७ कोटींच्या कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट वाढवून २२ हजार ४०५ कोटींचे उद्दिष्ट घेतले आहे. यामध्ये कृषी क्षेत्राला ४०२१ कोटी, उद्योगासाठी ५ हजार ६३५ कोटींचे व पीककर्जासाठी २ हजार २५० कोटीचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय बँकर्स समितीची वार्षिक कर्ज योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ही माहिती समोर आली.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय प्रबंधक महेश डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे,
सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, सर्व बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, विविध विभागांचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती. जिल्हा अग्रणी बँकेच्या वार्षिक ऋण योजना २०२३-२४ अहवालाचे प्रकाशन या वेळी जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले.
‘अधिकचे शुल्क घेतल्यास सीएससी केंद्रावर कारवाई’
शेतकऱ्यांना पीकविमा भरताना अधिकचे शुल्क आकारल्यास सीएससी केंद्रावर कारवाई करण्यात येणार. जिल्ह्यातील पीकविमा भरताना काही अडचणी आल्यास आपले सरकार सेवा केंद्र आणि पीकविमासाठी शासनांनी नियुक्ती केलेले चोलामंडल एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा समन्वयक, ईश्वर भिंगारे यांच्या- ८५५१०२०३१४ या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा.
तसेच कंपनीचा कार्यालाचा पत्ता ः एन-11 सुदर्शन नगर, जळगाव रोड, मयूरी हॉटेल जवळ, औरंगाबाद या पत्त्यावर देखील संपर्क साधता येईल. याबाबत सर्व कृषी अधिकारी, तहसीलदार यांनी शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्याबाबत मार्गदर्शन व जाणीवजागृती करून एकही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी. असे पाण्डेय यांनी निर्देशित केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.