Weather Stations : नंदुरबार जिल्ह्यात२०८ हवामान केंद्रे उभारणार

नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज प्राप्त व्हावा यासाठी जिल्ह्यात २०८ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
Weather Stations
Weather StationsAgrowon

तळोदा, जि. नंदुरबार ः जिल्ह्यातील नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज (Weather Forecast) प्राप्त व्हावा यासाठी जिल्ह्यात २०८ स्वयंचलित हवामान केंद्रे (Weather Stations) उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, सद्यःस्थितीत जिल्ह्यात मंडळनिहाय ३६ स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत, परंतु या केंद्रांमधून शेतकऱ्यांना अतिसूक्ष्म स्तरावरील माहिती उपलब्ध होण्यासाठी अडचणी येत होत्या. आता मात्र हवामान केंद्रांची संख्या वाढणार असल्याने, शेतकऱ्यांना हवामानावर आधारित शेती करणे व शेतीचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे अधिक सोपे होणार आहे.

Weather Stations
हवामान विभागातील ग्रंथालय ठरतेय संशोधनाचे केंद्र 

स्वयंचलित हवामान केंद्रांमधून कमाल-किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग, दिशा, सूर्यप्रकाशाचा कालावधी, पाऊस, बाष्पीभवनाचा वेग, जमिनीचे तापमान आणि जमिनीतील ओलावा या सर्व नोंदी सहजपणे उपलब्ध होत असतात.

Weather Stations
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र द्राक्ष शेतीसाठी ठरले फायद्याचे

तसेच या केंद्रांद्वारे पिकांची पेरणीपासून ते काढणीपर्यंत हवामानाची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना योग्य नियोजन करण्यास मदत होते. सध्या नंदुरबार जिल्ह्यात फक्त ३६ स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात कमीअधिक प्रमाणात पाऊस होतो. विविध भागांतील बदलते वातावरण आणि पावसाच्या परिस्थितीचा विचार करता सद्यःस्थितीतील हवामान केंद्रे अपुरी होती.

Weather Stations
Weather Update : गारठा कमी, उकाड्यात वाढ

शेतातील पिकांच्या वाढीसाठी प्रामुख्याने योग्य तापमानाची गरज असते. त्यात आर्द्रतेचे प्रमाण, ढगाळ हवामान, पावसातील खंड आणि तापमान यावरून शेतकऱ्यांना कीड व रोगांची तीव्रता अभ्यासणे शक्य होत असते. प्रत्येक पिकासाठी पाण्याची गरज वेगवेगळी असते. हंगामानुसार ही पाण्याची गरज बदलत असते, या सर्व अभ्यासासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे अत्यंत उपयुक्त असतात.

अचूक माहिती मिळणार

ग्रामपंचायतीच्या ठिकाणी अशा अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी झाली, तर त्यातून अचूक तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, पाऊस याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे योग्य व अचूक असा कृषिविषयक सल्लाही शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळणार आहे.

हवामान केंद्रासाठी जागा निवडीचे निकष

उपलब्ध जागा पाच मीटर बाय सात मीटर असावी.

जवळपास मोठा जलाशय, उष्णता स्रोत, दलदल, पाणथळ व उच्च वीजवाहिनी नसावी.

स्वयंचलित हवामान केंद्र उभारले जाणार असल्याच्या जवळ मोठी झाडे अथवा इमारत असू नये.

वाऱ्याची दिशा आणि वेग मोजणारा सेन्सर जमिनीपासून तीन मीटर उंचीवर असावा.

सभोवताली किंवा इमारत प्रकार असल्यास उंचीच्या १० पट अंतरावर सेन्सर उभारण्याची निश्‍चिती करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com