Agriculture Department : ‘कृषी’तर्फे जिल्ह्यात १६ भरारी पथकांची नजर

Kharif Season : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यात खरीप हंगामाकरिता ६.२७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यात खरीप हंगामाकरिता ६.२७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे.

खरीप हंगामासाठी खते व बियाणे यांची मागणी शासनाकडे नोंदविली असून खतांचा साठादेखील जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. बोगस खते व बियाण्यांची विक्री होऊ नये यासाठी १६ भरारी पथकांची नियुक्ती केली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी मयूरी झोरे यांनी दिली.

गतवर्षी खरीप हंगामासाठी ६.४१ लाख हेक्टर क्षेत्र निश्चित केले होते, यंदा ६.२७ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्‍चित करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी युरिया, डीएपी, एमओपी व संयुक्त खतांची २.६० लाख टनांची मागणी नोंदविण्यात आली होती.

यापैकी शासनाकडून २.३३ टन खतांचा साठा मंजूर झाला आहे. यात युरिया ८९ हजार १७० टन आहे. १५ मे अखेर विविध खत उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्यात २५ हजार टन खतांचा पुरवठा केला आहे.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी विभागाची भरारी पथके सज्ज

तसेच शेतकऱ्यांना विविध कृषी निविष्ठा या दर्जेदार व योग्य दराने मागणीनुसार मिळण्याकरिता जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर एक अशा एकूण १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. खरीप हंगामात पेरणीसाठी विविध पिकांचे एकूण १.०१ लाख क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

Agriculture Department
Agriculture Department : केंद्र, राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत २९ कोटी २२ लाखांवर निधी खर्च

इतर खतांची सक्ती नको

शेतकऱ्यांना आवश्यक कृषी निविष्ठांव्यतिरिक्त इतर जैविक खते व विद्राव्य खते यांच्या खरेदीबाबत कोणतीही सक्ती कृषी विक्री केंद्र व खत कंपन्या यांच्याकडून करण्यात येऊ नये, असे आवाहन कृषी विकास अधिकारी यांनी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा परवानाधारक व कंपनी प्रतिनिधी यांना केले आहे. तसे निदर्शनास आल्यास त्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

निविष्ठा खरेदीवेळी घ्या काळजी

गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच निविष्ठा खरेदी कराव्यात. बनावट, भेसळयुक्त निविष्ठा खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह खरेदी कराव्यात.

निविष्ठा खरेदी करताना सील अथवा मोहरबंद पाकिटे, पिशव्या किंवा बाटल्या असल्याची खात्री करावी. उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत पाहावी. कमी वजनाच्या निविष्ठा व छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री करणे हा गुन्हा आहे. यासाठी कृषी विभाग व वजनेमापे निरीक्षकांकडे संपर्क साधावा, असे आवाहन झोरे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com