Farmer Loan : व्याजमाफीच्या यादीत १२,५१३ आंबा बागायतदार

Mango Farmer : आंबा बागायातदारांना सरसकट कर्जावरील तीन महिने व्याजमाफी मिळण्यासाठी जिल्ह्यातील १२ हजार ५१३ कर्जदार बागायतदारांचे प्रस्ताव उपनिबंधक कार्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.
Mango Season
Mango SeasonAgrowon
Published on
Updated on

Mango Market Update : आंबा बागायातदारांना सरसकट कर्जावरील तीन महिने व्याजमाफी मिळण्यासाठी जिल्ह्यातील १२ हजार ५१३ कर्जदार बागायतदारांचे प्रस्ताव उपनिबंधक कार्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.

व्याजमाफीपोटी ३ कोटी ३५ लाख ९३ हजार १७८ रुपयांची मागणी केली आहे. या रकमेची तरतूद शासनाला अंदाजपत्रकात करावी लागणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची मंजुरी अत्यावश्यक आहे.

फेब्रुवारीअखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला २०१४-१५ या वर्षामध्ये अवकाळी पाऊस झाला होता. त्या वेळी आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. या वेळी जिल्हा प्रशासनाने पूर्ण जिल्हा महसूल विभागाकडून बाधित म्हणून जाहीर केला होता. या हंगामात अनेक शेतकऱ्यांची बँक खाती एनपीएत गेल्यामुळे जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. तेव्हा बागायतदारांनी कर्जमुक्तीची मागणी केली.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी आणि कर्ज पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही. यासंदर्भात सात वर्षे बागायतदार पाठपुरावा करत होते. ९ फेब्रुवारी २०२३ ला पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सरसकट कर्जावरील तीन महिने व्याजमाफीचे प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे आदेश दिले होते.

Mango Season
Mango Rate : आंब्याच्या दरात का झाली वाढ?

त्यानुसार जिल्हा उपनिबंधक विभागाने बँकांकडून आलेल्या माहितीनुसार १२ हजार ५१३ बागायतदारांचे ३ कोटी ३५ लाख ९३ हजार १७८ रुपयांचे प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत. याला शासनस्तरावरून तरतूद करण्याचे आश्‍वासन दोन आठवड्यांपूर्वी रत्नागिरी दौऱ्यावर आलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बागायतदारांना दिले होते.

शासनाला प्रस्ताव सादर झालेला असल्यामुळे व्याजमाफी केव्हा होणार याकडे बागायतदारांचे लक्ष लागले आहे. यंदाचा हंगामही यथातथाच गेल्यामुळे बागायतदार अडचणीत असून, बँक कर्ज, कीटकनाशकांचा खर्च फेडणे अशक्य होणार आहे. या कालावधीत व्याजमाफी झाली तर थोडा दिलासा मिळू शकतो.

Mango Season
Sharad Pawar Mango Variety : अन् शेतकऱ्यानं आंब्याला दिलं शरद पवारांच नाव

दरम्यान, शासनाला सादर केलेल्या प्रस्तावात जिल्हा सहकारी बँकेतील ७६७ प्रस्ताव आणि १५ लाख ३४ हजार रुपये, विदर्भ कोकण बँक २ हजार ७४० लाभार्थींचे ४७ लाख १९ हजार ५०८, बँक ऑफ इंडियातील ७ हजार ४९७ लाभार्थींचे १ कोटी ६९ लाख, बँक ऑफ महाराष्ट्रतील ६६९ प्रस्ताव आणि ५१ लाख २७ हजार रुपये, एसबीआयचे ३१७ लाभार्थी आणि २३ लाख ९१ हजार रुपयांचे व्याज माफी करावी लागणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात ४२ लाख रुपये जमा

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने यापूर्वी आंबा बागायतदारांचे व्याजमाफीचे ५५८ प्रस्ताव शासनाकडे पाठवले होते. त्यातील ४८० लाभार्थींचे ४२ लाख ७९ हजार ३३६ रुपये व्याजापोटी बँक खात्यात जमा केले आहेत. ७८ जणांचे १० लाख ९२ हजार रुपये वितरित करावयाचे शिल्लक आहेत.

व्याजमाफीचा प्रस्ताव शासनाला सादर झाला आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला होता. ही व्याजमाफी मिळावी यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहेत.
- प्रसन्न पेठे, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com