Team Agrowon
वादळी पावसामुळे आंब्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे खवय्यांसाठी आमरसाची चवही आंबट झाली आहे.
बाजारात आवक कमी झाल्याने आमरसाचे भाव वाढलेत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचे मुंबईत पाहायला मिळत आहे.
आंबा हे सर्वांचे आवडते फळ आहे. त्याच्यापासून बनणारे आमरस सर्वांनाच आवडते.
आंब्यापासून आईस्क्रीम, आंबा शिरा, आंबा बर्फी, आंबा ज्यूस, आंबा मिल्कशेक असे असंख्य पदार्थ बनवले जातात.
आमरस हा अधिक गुणकारी मानला जातो. त्यामुळेच उन्हाळ्यात आमरसाला अधिक मागणी असते.
सध्या मुंबईमध्ये अस्सल आमरसाचे भाव १० ते २० टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
अवकाळी पावसामुळे व वादळ यामुळे आंबा मोहर गळून गेला आहे. त्यामुळे यावर्षी आंब्याची आवक कमी झाली आहे.