Vicky Research Farm : जातिवंत दुधाळ गाईंचा ‘विक्की रिसर्च फार्म’

Cow Rearing : हेलसिंकी इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेसमध्ये (हायलाइफ) विक्की रिसर्च फार्म हे गाईंबाबत संशोधन करणारे केंद्र आहे. या केंद्रामध्ये १५५ हेक्टर जिरायती जमीन असून, ६० दुधाळ गाईंचे संगोपन करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या केंद्रामध्ये करण्यात आला आहे.
Dairy Farm
Dairy FarmAgrowon

डॉ. राजेंद्र सरकाळे

Rearing of Milch Cows : पशुपालन हा शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाचा स्रोत असतो. दुधाची मागणी सतत वाढत आहे. त्याचबरोबरीने दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठही चांगली मिळते. विशेषतः गायींचे आरोग्य आणि उत्पादनवाढीसाठी विविध प्रयत्न सर्वत्र होताना दिसतात.

संशोधनातून चांगला परिणाम मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. विक्की रिसर्च फार्म या अशाच एका संशोधन केंद्राला भेट देण्याची आम्हाला संधी मिळाली आणि पाळीव पशुधनावर किती बारकाईने संशोधन केले जाऊ शकते, हे पाहायला मिळाले.

हेलसिंकी इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेसमध्ये (हायलाइफ) विक्की रिसर्च फार्म हे गाईंसाठीचे संशोधन केंद्र आहे. या केंद्रामध्ये १५५ हेक्टर जिरायती जमीन असून ६० दुधाळ गाईंचे संगोपन करण्यात आले आहे.

जिरायती क्षेत्राचा बहुतांशी भाग गाईंच्या चारा उत्पादनासाठी वापरला जातो. या प्रक्षेत्राच्या अर्ध्या भागात गवताळ कुरण आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये पशुखाद्य, धान्य आणि प्रथिनयुक्त पीक (उदा. फॅबा बीन) लागवडीसाठी तसेच जैविक विज्ञान संशोधनासाठी चाचणी भूखंड म्हणून वापरले जाते.

Dairy Farm
Dairy Farming Success Story : दूध व्यवसायात अग्रेसर ‘निमगाव वाघा’

विक्की रिसर्च फार्ममधील दुधाळ गाईंचे शास्त्रोक्त संगोपन, प्रजनन, दुग्धोत्पादन, संकरित पैदास आणि सकस आहारावर संशोधन केले जाते. सध्या संशोधनाचे अनेक नवीन विषय हाताळले जात आहेत. उदाहरणार्थ, हवामानातील बदल, अन्न उत्पादनातून निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करणे आणि मातीतील कार्बन उत्सर्जन आदी विषयांवर फार्ममध्ये संशोधन होत आहे.

देशाच्या वाढत्या लोकसंख्येला पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या शाश्‍वत अन्न कसे पुरवता येईल यावर विक्की फार्मने लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या देशात देखील विक्की रिसर्च फार्म प्रमाणे गाय, म्हशीबाबतच्या संगोपनाद्वारे दूधवाढीबाबत आधुनिक पद्धतीने संशोधन उपक्रम राबविले गेल्यास पशुपालकांना फायदा होईल.

आधुनिक डेअरी फार्म

आम्ही पाहिलेला डेअरी फार्म स्वयंचलित पद्धतीने कार्यरत होता. स्वयंचलित दूध प्रणालीद्वारे गाईंचे दूध काढले जाते. स्वयंचलित फीड वितरण वॅगनद्वारे खाद्य मिश्रण वितरित केले जाते. गायींचे खाद्य नियंत्रण आरआयसी या अत्याधुनिक संगणक प्रणालीद्वारे नियंत्रण केले जाते. या संगणक प्रणालीमध्ये प्रत्येक गाईने किती खाद्य सेवन केले आणि किती दूध दिले याची माहिती संकलित केली जाते. या सांख्यिकी माहितीच्या आधारे कोणत्या जातीची आणि वयाची गाय अधिक दूध देते याचे निष्कर्ष काढले जातात.

फार्म दोन विभागांमध्ये विभागले गेले आहे.
अ) फ्री स्टॉल विभाग : गाईंसाठी मोठा विभाग आहे. गोठा मुक्त संचार पद्धतीचा आहे.
ब) टायस्टॉल विभाग : या विभागात १२ गायींवर वैयक्तिक संशोधन केले जाते. येथे गायी बांधून ठेवल्या जातात. या ठिकाणी गायींचे पोषण, संगोपन, वर्तन, तंत्रज्ञान आदी अनेक प्रकारचे पशुसंबंधी संशोधन केले जाते.

Dairy Farm
Dairy Business : विदर्भात दुग्ध व्यवसायाला तयार केली बाजारपेठ

उन्हाळ्यात सर्व गाईंना दररोज कुरणात मोकळे सोडले जाते. आम्हाला या फार्ममध्ये विस्तारलेले कामकाज पाहावयास मिळाले. या ठिकाणी गाईंची खूप बारकाईने काळजी घेतली जाते. विविध प्रकारचे कामकाज पाहावयास मिळते. या ठिकाणी गाईंवर विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. चाचण्या पूर्ण झाल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढला जात नाही. खात्रीशीर निष्कर्ष मिळाल्यानंतर त्याचे परिणाम जाहीर केले जातात. नवीन जातीच्या गाई, वासरांची
चाचणी प्रक्रिया पूर्ण करूनच त्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जातो.

या फार्ममध्ये नॉर्वेजियन रेड आणि जर्सी जातीच्या ६० गायी आहेत. एक गाय दररोज ४५ ते ५५ लिटर दूध देते. महिला व्यवस्थापकांच्या हाती संपूर्ण प्रक्षेत्राचा कारभार आहे.

गाईंना खाद्यपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सकस चारा पिकांची लागवड करण्यात आली आहे. सकस चारा पिकांची लागवड करून गाईंच्या दुधाचा स्निग्धांश वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.

गाईच्या दुधातील प्रथिने किती आहेत? कोणते खाद्य दिल्यानंतर किती दूध वाढते याविषयी संशोधन केले जाते. दुधामधील स्निग्धांश, प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणते अन्नघटक किती प्रमाणात देणे आवश्यक आहे, याबाबत संशोधन केले जाते. गाईच्या पोटात चर्वण कसे होते व दूध उत्पादनात वाढ किती होईल याची चाचणी यंत्राद्वारे केली जाते. बैलांच्या वीर्याचीही चाचणी केली जाते. जेवढे चांगले वळू तेवढे त्यांच्या वीर्यापासून तयार होणारी वासरे सशक्त निर्माण होतील, या दृष्टीने प्रयत्न केले जातात.

फार्ममध्ये धान्य काढणी आणि सुकविण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री, तंत्रज्ञान वापरले जाते. या फार्ममधून दरवर्षी सहा लाख लिटर दूध विकले जाते. गाईच्या चाऱ्यासाठी दरवर्षी एक हजार टनांहून अधिक गवताचे मूरघास तयार केले जाते. दरवर्षी सुमारे २०० टन तृणधान्ये आणि फॅबा बीनचे उत्पादन होते. गायींच्या खाद्यासाठी वापर करून शिल्लक राहिलेले उत्पादन अन्य उद्योगांना विकले जाते.

विक्की रिसर्च फार्मतर्फे दरवर्षी विविध संमेलनांचे आयोजन केले जाते. बालवाडी आणि शाळेतील मुलांपासून ते सार्वजनिक क्षेत्रातील अधिकारी, कंपन्या आणि संस्था या फार्मला भेटी देतात. प्रतिवर्षी एक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला जातो. त्याचदरम्यान गायींना हिवाळ्यानंतर प्रथमच कुरणात मोकळे सोडले जाते. शहराच्या आसपास हजारो लोक दरवर्षी प्राण्यांसोबत आपला वेळ घालवण्यासाठी इथे येतात. अशा उपक्रमांमुळे नागरिकांना पाळीव प्राण्यांची ओढ निर्माण होते. देशाच्या पशुधनात वाढ होण्यासाठी त्याची मदत होते.

संपर्क : डॉ. राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२०
(लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com