Dairy : अल्पभूधारक कुटुंबाची दुग्ध व्यवसायात धवल प्रगती

कुंडल (जि. सांगली) येथील कुंभार कुटुंबाची अवघी दहा गुंठे जमीन होती. मात्र कितीही कष्ट घेण्याची तयारी, जिद्द आणि संयुक्त कुटुंबाची एकी यांच्या जोरावर दुग्ध व्यवसायाचे (Dairy Business) उत्कृष्ट नियोजन, व्यवस्थापन त्यांनी केले. आज ४० पर्यंत गायींची (Cow Rearing) संख्या असून शेती खरेदी, बंगला उभारणी आणि एकूणच आर्थिक प्रगती करण्यापर्यंत उल्लेखनीय यश कुटुंबाने मिळवले आहे.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon

सांगली जिल्ह्यातील पलूस हा द्राक्ष (Grape) व ऊसशेतीसाठी (Sugarcane) प्रसिद्ध असलेला तालुका आहे. उसाचे एकरी शंभर टन उत्पादन घेण्यात इथला शेतकरी माहीर आहे. याच तालुक्यातील कुंडल येथील दिलीप शिवाजी कुंभार यांची अवघी १० गुंठे शेती होती. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे क्षेत्र पुरेसे नव्हते. त्यामुळे दिलीप यांनी येथील औद्योगिक वसाहतीत काम सुरू केले. तरीही कुटुंबाचा डोलारा उभारला जात नव्हता. मग दिलीप यांच्या पत्नी नीलम यांनी घरात पिठाची चक्की आणि मिरचीचा डंक व्यवसाय सुरू केला.

Dairy Business
Dairy : कुटुंबाच्या दुग्धव्यवसायाचा कणा बनलेली 'श्रद्धा''

दावणीला दोन म्हशी होत्या. त्यावर प्रपंच सुरू होता. दिलीप यांची मुले पवन, ओंकार आणि विक्रम यांचे शिक्षण सुरू होते. दरम्यान, दिलीप यांचे बंधू सदाशिव कुंभार यांनी पवन यांना जनावरांचे डॉक्टर होण्याचा सल्ला दिला. तो सल्ला मनावर घेत पवन यांनी हे शिक्षण आणि अन्य भावांनीही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी हुकमी पर्याय शोधण्यास सुरुवात झाली. त्यासाठी दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले.

Dairy Business
Dairy Production : दुर्गम मेळघाटात स्वयंरोजगाराची जागर

दुग्ध व्यवसायाची उभारणी

सन २००५ मध्ये एचएफ (होल्स्टिन फ्रिजियन) गायींचा गोठा उभारण्याचे नियोजन सुरू केले. परंतु आर्थिक भांडवल नव्हते. दावणीला असलेली म्हैस २० हजारांना विकली. गायी घेण्यासाठी भटकंती सुरू झाली. सतरा हजार रुपयांना गाय खरेदी केली. पलूस येथील बाजारातूनही दोन पाड्या खरेदी केल्या.

सुमारे दोन वर्षांत गायींची संख्या दहापर्यंत पोहोचली. क्षेत्र कमी असल्याने चाऱ्याचा प्रश्न होता. विकतचा चारा देण्याशिवाय पर्याय नव्हता. खर्च वाढला होता. पण तो कमी करण्याचे प्रयत्न सुरू होते. गोठ्यातील बारकावे अनुभव व अभ्यासातून उमजू लागले. दूध उत्पादनात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला. गायी खरेदीसाठी दूध संघाची मदत होते ही माहिती मिळताच राजारामबापू दूध संघाकडे धाव घेतली. त्यातून बंगळूरहून १० गायी आणण्यासाठी आर्थिक मदत झाली. आता गोठ्यात गायींची संख्या वाढली.

Dairy Business
Dairy, Poultry : दूध, पोल्ट्री हे शेतीपूरक व्यवसायच झाले सुबत्तेचे कारण

चोख व्यवस्थापन व कुटुंबाची साथ

ओंकार व विक्रम यांनी पूर्णवेळ व्यवसायाचे व्यवस्थापन सांभाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे मजुरांची गरज व त्यावरील खर्च कमी केला. पवन आपली पशुवैद्यकीय सेवा सांभाळून आपल्या गोठ्यातील गायींचे आरोग्य व्यवस्थापनही पाहू लागले. त्यांच्या मार्गदर्शनातून लसीकरण, औषधे व स्वच्छतेच्या आनुषंगिक बाबी वेळेत होऊ लागल्या. त्यामुळे आणखी ऊर्जा मिळाली. सध्या लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय. मात्र कुंभार यांनी ते वेळेवरच केल्याने धोका टळला.

एक दिवस आड गोठ्याचे ‘सॅनिटायझेशन’ केले. गाईच्या वेताचे चक्र व्यवस्थित ठेवले आहे. पहाटे पाचपासून गोठ्यातील कामकाजाला सुरुवात होते. सहा वाजता गोठा स्वच्छ करून दूध काढून ते चितळे डेअरीच्या केंद्राला पाठवले जाते. आपल्या वातावरणात गोठ्यातच पैदास वाढवण्याचे व शुद्ध वंशावळ टिकवण्याचे प्रयत्न झाले. आई-वडिलांसह पवन यांच्या पत्नी करिष्मा, ओंकार यांच्या पत्नी रूपाली व विक्रम यांच्या पत्नी प्रियांका यांचीही व्यवसायात चांगली साथ मिळाली. त्यातूनच आज कुटुंबाला व्यवसायात प्रगती करणे शक्य झाले.

चाऱ्याबाबत स्वयंपूर्णता

जनावरांचा डोलारा सांभाळणे आजच्या काळात फारच मुश्कील झाले आहे. चारा स्वतःच्या शेतातील असेल तर काही प्रमाणात खर्च कमी होतो. सन २०१८ नंतर मात्र विकतचा चारा आणणे थांबवण्याचे ठरले. त्यासाठी शेत खरेदी करण्याचा निर्णय घेतला. व्यवसायातून मिळत असलेल्या उत्पन्नातूनच त्याची खरेदी करणे शक्य झाले. कुंडलपासून जवळ कडेगाव तालुक्यातील कुंभारगाव येथे आज ७० गुंठे क्षेत्र आहे. त्यात विविध चारा पिकांची लागवड होते.

आजचा दुग्ध व्यवसाय दृष्टिक्षेपात

-गाईंची एकूण संख्या- ४०

-प्रति दिन दूध संकलन- ३५० लिटरच्या आसपास. पाड्यांसाठी ५० लिटर दूध आवश्‍यक लागते.

-मिळणारा दर- ३५ रुपये प्रति लिटर (फॅट ४ व एसएनएफ ८.५)

-परिसरात द्राक्ष, ऊस शेती मोठ्या प्रमाणात असल्याने शेणखताला मागणी चांगली आहे. वर्षाकाठी सुमारे ४६ डंपिंग ट्रेलर शेण मिळते. परिसरातील शेतकरी जागेवर येऊन प्रति ट्रेलर ३५०० रुपये दराने खरेदी करतात.

-मासिक नफा- ३० ते ४० टक्के.

किफायतशीर व्यवसायामागील शास्त्र

ओंकार सांगतात, की वार्षिक दूध संकलनात सरासरी एक लाख लिटर व त्याहून अधिक सातत्य ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवूनच आम्ही काम करतो. तरच अर्थशास्त्र किफायतशीर ठरते. शिवाय मजूरबळ कमी केले आहे. सन २०१६ व २०१७ या सलग दोन वर्षी सातत्याने एक लाख लिटरचे हे सातत्य व पुरवठा कायम ठेवल्याने राजारामबापू दूध संघाचा पुरस्कारही आम्ही मिळवला.

संपर्क ः ओंकार कुंभार- ९५६१६४७३६४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com