Paddy Cultivation : जस्त समृद्ध भाताची रुजवात...

Agro Product Producer Company : बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन कोल्हापूर येथील नॅचरल फार्म्स ॲण्ड ॲग्रो प्रॉडक्ट प्रोड्यूसर कंपनी लिमिडेट या शेतकरी उत्पादक कंपनीने गेल्या तीन वर्षांत मूल्यवर्धित (बायोफोर्टिफाइड) डीआरआर धान-४८ या भात जातीच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
Paddy Crop
Paddy CropAgrowon

Natural Farms and Agro Product Producer Company : कोल्हापूर जिल्ह्यातील युवा शेतकरी अभिजित पाटील यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांना एकत्र करून २०१९ मध्ये नॅचरल फार्म्स ॲण्ड ॲग्रो प्रॉडक्ट प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडची स्थापना केली. या कंपनीचे सुमारे २२०० सभासद आहेत. अभिजित पाटील यापूर्वी साखर उद्योगातील घडामोडींची माहिती देणाऱ्‍या वेबसाइटमध्ये नोकरी करत होते.

तेथे काम करत असताना त्यांचा प्रयोगशील शेतकरी आणि विविध संस्थांशी संपर्क झाला. कोरोना काळात नोकरी सोडून दिल्यानंतर त्‍यांनी ओळखीच्या शेतकऱ्यांच्या साह्याने शेतकरी उत्पादक कंपनीची स्‍थापना केली.

सभासदांशी झालेल्या चर्चेतून भात पिकामध्ये काहीतरी वेगळे प्रयोग करण्याचे ठरले. या चर्चेतून त्यांनी हैदराबाद येथील भारतीय भात संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अरुण सोनराज यांची भेट घेतली. त्यातून नवीन जातीच्या लागवडीला चालना मिळाली.

Paddy Crop
Paddy Crop: भात पिकासाठी बारदानेची तयारी जोरात

याबाबत अभिजित पाटील म्हणाले, की २०२१ मध्ये डॉ. अरुण सोनराज यांच्या सल्ल्यानुसार आम्ही जस्ताने समृद्ध असलेली मूल्यवर्धित (बायोफोर्टिफाइड) डीआरआर धान-४८ या जातीचे बियाणे आणले. हे बियाणे चंदगड, कागल आणि राधानगरी तालुक्यांतील प्रयोगशील भात उत्पादकांना दिले. उपलब्ध बियाण्यातून १७ गुंठे क्षेत्रावर लागवड झाली. इतर भात जातींप्रमाणेच या नवीन जातीची लागवड आणि व्यवस्थापन करण्यात आले.

Paddy Crop
Paddy Rate : पेंढ्याला प्रतिकिलो केवळ दोन रुपयांचा भाव

नेहमीच्या भात जातींच्या पानांचा रंग गडद हिरवा असतो. मात्र डीआरआर धान-४८ जातीच्या पानांना थोडी पिवळी झाक आहे. पिकाचे चांगले व्यवस्थापन केल्याने आम्हाला अपेक्षित उत्पादन मिळाले.

२०२२ मध्ये आम्ही उपलब्ध बियाण्यातून एक एकर क्षेत्रावर लागवड केली. यंदाच्या वर्षी ३४ शेतकऱ्यांनी आठ एकरांवर लागवड केली होती. आम्हाला या जातीचे एकरी सरासरी २२ क्विंटल उत्पादन मिळाले. यातून १७६ क्विंटल भात बियाणे तयार झाले आहे.

डीआरआर धान-४८ या जातीच्या वैशिष्ट्यांबाबत अभिजित पाटील म्हणाले, की भाताची ही जात सुधारित तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आली आहे. ही जात १३५ ते १४० दिवसांत तयार होते. मजबूत देठ, मोठी पाने आहेत. ही जात रोगप्रतिकारक आणि पाण्याचा ताण सहन करणारी आहे.

लोंब्या देखील चांगल्या भरतात. त्यामुळे उत्पादनात वाढ मिळाली आहे. दाणा बारीक असल्याने ग्राहकांची पसंती आहे. पॉलिश केलेल्या तांदळात २१ पीपीएम आणि पॉलिश न केलेल्या तांदळात २५ पीपीएम जस्ताचे प्रमाण मिळाले आहे. लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून या बियाण्यास पसंती मिळाली आहे.

- अभिजित पाटील, ९०४९५ ९९७९२

आरोग्यसाठी फायदेशीर

मुले आणि स्त्रियांमधील कुपोषणावर मात करणे शक्य.

लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी फायदेशीर.

गर्भवती महिलांचे आरोग्य आणि नवजात शिशूच्या वाढीसाठी उपयुक्त.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com