District Bank Proposal : उद्दिष्ट कमी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रस्ताव

Crop Loan Proposal : खरीप हंगामासाठी पीककर्जाचे उद्दिष्ट २० टक्के कमी करून देण्याची मागणी बँकेने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
Yavatmal District Co-operative Bank
Yavatmal District Co-operative BankAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थिती अडचणीची झाल्याने सहा महिन्यांपासून बिगर शेती कर्जवाटप बंद आहे. आता आगामी खरीप हंगामासाठी पीककर्जाचे उद्दिष्ट २० टक्के कमी करून देण्याची मागणी बँकेने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे बँकेचे उद्दिष्ट १३० कोटी रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात जिल्हा बँक दरवर्षीच आघाडीवर असते. जिल्हा बँक पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करीत असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. बँकेने गेल्या खरीप हंगामात उद्दिष्टाच्या तुलनेत १०८ टक्के पीककर्जाचे वाटप केले. गेल्या खरीप हंगामात मध्यवर्ती बँकेने जवळपास सातशे कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप केले.

Yavatmal District Co-operative Bank
Wardha District Bank : वर्धा जिल्हा बँकेचे होणार पुनरुज्जीवन

या पीककर्जाची वसुली अद्याप सुरू झालेली नाही. बँकेने जास्त पीककर्जाचे वाटप केल्याने बँकेची स्थिती अडचणीत आली आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बिगर शेती कर्ज बंद करण्याची वेळ बँकेवर आली आहे. कर्मचाऱ्यांचे कर्जही तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. यंदा आर्थिक ताण कमी करण्यासाठी बँकेने पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट कमी करण्याचे पत्र शासनाला पाठविले आहे.

खरीप हंगामात ६६५ कोटी रुपयांचे टार्गेट बँकेला असते. यात यंदा वीस टक्के कमी करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास १३० कोटी रुपयांनी बँकेचे उद्दिष्ट कमी होणार आहे. पाचशे कोटी रुपयांचे पीककर्ज जिल्हा बँक करणार आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेकडे शेतकऱ्यांचा कल असणार आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बँका दिलेले उद्दिष्ट पूर्ण करीत नसल्याने वाढीव उद्दिष्ट घेणार का, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

Yavatmal District Co-operative Bank
District Co-Operative Bank : नियमित कर्ज फेडा; शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्या

जिल्हा बँकेचे उद्दिष्ट कमी झाल्यानंतर तेवढे उद्दिष्ट राष्ट्रीयकृत बँकांकडून पूर्ण घेण्यासाठी महसूल विभागाला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांना शून्य टक्क्याने पीककर्ज देते. हीच बँक खरिपात शेतकऱ्यांना सहज पीककर्ज देते. यंदा आर्थिक अडचणीमुळे बँकेने उद्दिष्ट कमी करण्याची मागणी केली आहे. याचा फटका काही प्रमाणात शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. उद्दिष्ट कमी झाल्यानंतर बँक यंदा त्यापेक्षा जास्त पीककर्जाचे वाटप करण्याच्या स्थितीत नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com