Dairy Farming : कुटुंबाच्या एकजुटीतून दुग्धव्यवसायात समृद्धी

Dairy Business : परिवाराची एकजूट, त्यातील प्रत्येकाचे योगदान व व शास्त्रीय पद्धतीच्या व्यवस्थापनाची जोड देत या कुटुंबाने द्राक्षशेतीला या व्यवसायाची उत्तम जोड दिली आहे. सव्वाशेहून अधिक पशुधन, गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन व थेट विक्री व्यवस्था यातून परिवाराने शेती व्यवसायात समृद्धी निर्माण केली आहे.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : नाशिक शहराच्या पश्चिम भागात असलेल्या दरी गावात (ता. नाशिक) ढेरिंगे हे संयुक्त कुटुंब राहते. घरातील प्रमुख व ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे गेणू कोंडाजी ढेरिंगे. त्यांना केशव, दत्तू, बबन व कैलास ही मुले आहेत. घरची १२ एकर शेती व प्रामुख्याने द्राक्षपीक आहे. सर्व मुले वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ४० वर्षांपासून शेतीची जबाबदारी पाहतात.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शेतीचा गाडा पुढे नेला. शेतीला जोडधंदा असावा या उद्देशाने कुटुंबाने १९९७ मध्ये म्हशीचे संगोपन सुरू केले. त्यावेळी दुधाची विक्री नाशिक शहरातील पेठ परिसरात व्हायची. काही अडचणीमुळे पुढे व्यवसाय बंद पडला. आज घरच्या तिसऱ्या पिढीतील केशव यांचे चिरंजीव विलास दुग्धव्यवसायाची जबाबदारी सांभाळतात. त्यांना त्यांच्याच तरुण पिढीतील अनिल, सागर व आदेश या भावांची साथ मिळते.

चिकाटीने सांभाळला व्यवसाय

दुग्ध व्यवसाय सांभाळताना ढेरिंगे कुटुंबाला अनेक चढ उतार, नुकसान सोसावे लागले. मात्र जिद्दीने त्यांनी सातत्य ठेवले. काही वर्षांपूर्वी लाळ्या खुरकूतचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संकटमय परिस्थिती निर्माण झाली होती, त्यातून बरेच काही शिकायला मिळाले. आज १६ वर्षांच्या अनुभवातून शास्त्रीय पध्दतीच्या व्यवस्थापनातून कुटुंबाने व्यवसायात चांगली प्रगती केली आहे. कुटुंबातील एकजूट व प्रत्येकाने शेती व दुग्ध व्यवसायातील आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून काम करणे या बाबी देखील कुटुंबाला पुढे नेण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.

Dairy Business
Dairy Farming : ‘वसुधारा‘ने घडविली धवल क्रांती

कालवड पैदास कार्यक्रमाचे यश

सुरवातीला कुटुंबाकडे अवघ्या दोन गायी व काही म्हशी होत्या. पुढे २३ हजारांची गाय नाशिक बाजारातून खरेदी केली. शास्त्रोक्त पद्धतीने रेतन, जातिवंत कालवड पैदास कार्यक्रम कुटुंबाने हाती घेतला. गाय माजावर आल्याची तारीख, रेतन तसेच वासराच्या, गायीच्या विविध टप्प्यातील वजन,या सर्व बारीकसारीक तपशिलाच्या नोंदी करून ठेवल्या.

गोठ्यात बहुतांशी पैदास केल्याने गायींच्या खरेदीवरील मोठ्या खर्चाला आळा बसला. रेतनासाठी वळू वापरला जातो. त्यामुळे गायींची आनुवंशिकता, दूध उत्पादकता वाढ मिळते आहे. प्रति दिन २५ लिटरहून अधिक दूध देणाऱ्या काही जातिवंत गायीही कुटुंबातील गोठ्यात पाहण्यास मिळतात.

Dairy Business
Dairy Farm : न्यूझीलंडमधील निंबाळकर फार्म्स...

दुग्धव्यवसायातील बाबी

  • १०० बाय ६० व ६० बाय ३० फूट असे दोन गोठे. गोठ्याची उंची १५ फूट असून हवा खेळती राहिल्याने माशी, डास यांचा प्रादुर्भाव नाही.

  • उन्हाळ्यात गोठ्यातील तापमान नियंत्रणासाठी फॉगर प्रणाली.

  • पाण्याच्या २४ तास उपलब्धतेसाठी १२ हजार लिटरची टाकी. पाणी पिण्यासाठी जागेवरच वॉटर बाउल व्यवस्था.

  • गायींना बसण्यासाठी रबर मॅट. गोठ्यात कोंबड्यांचा मुक्त संचार. त्यामुळे गोचीड नियंत्रण.

  • आजमितीला एकूण गायी ११५ असून सर्व एचएफ संकरित आहे. दुधाळ गायी ८० पर्यंत असून कालवडी १५, वासरे २० व म्हशी (मुऱ्हा, जाफराबादी) १२ आहेत. खिलार बैल दोन व एक घोडाही आहे. जोडीला देशी १२ कोंबड्यांचे पालनही केले जाते.

  • वर्षभर दूध उत्पादनात सातत्य कायम राहील यादृष्टीने सरासरी ५० गायी दुभत्या राहतील असे मुख्य नियोजन. दररोज सरासरी एकहजार ते अकराशे लिटर दूध संकलन.

  • दुधाची गुणवत्ता टिकवण्यासाठी ओल्या, सुक्या चाऱ्याचे व खनिजद्रव्यांचे संतुलित नियोजन.

  • सहा स्वयंचलित दूध काढणीयंत्रे. त्यामुळे वेळेवर दूध काढणी होऊन श्रम बचतही होते.

  • तीन मजूर तैनात.

  • खर्च, विक्री, उत्पन्नाच्या दररोजच्या नोंदी.

  • पशुवैद्यकांचे वेळोवेळी मार्गदर्शन व देखरेख. त्यानुसार उपचार. सर्व रोगांचे वेळेत लसीकरण. गोठ्यातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, वेळेवर शुद्ध पाणी पुरवठा. ४ ते ५ महिने वयाच्या कालवडीला ब्रूसीलेसिस लसीकरण. दर महिन्याला वजन तपासणी

  • चारा कुट्टी यंत्राची सुविधा. गोठ्यातील जनावरांची संख्या जास्त असल्याने गरजेनुसार उमराळे (ता.दिंडोरी), सिन्नर व इगतपुरी तालुक्यातून चारा खरेदी केली जाते. चांदोरी (ता.निफाड) भागातून ऊस बांडी तर पेठ भागातून सुक्या गवताची खरेदी होते. मका आणून मुरघास निर्मितीही केली जाते.

  • दूध काढणी, चारा कापणी व कुट्टीसाठी अखंडित वीज पुरवठ्यासाठी जनित्राची व्यवस्था

विलास ढेरिंगे ८२७५८९३६४८

बबन ढेरिंगे ९४२२५३२३०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com