Dairy Farm : न्यूझीलंडमधील निंबाळकर फार्म्स...

Diwali Article 2024 : मुंबईमध्ये वाढलेला समीर पशू आणि निसर्गाच्या आवडीतून पशुवैद्यकीय शिक्षण घेतो. या दरम्यान त्याला न्यूझीलंडमधील डेअरी उद्योगाची माहिती मिळते आणि एक स्वप्न उराशी बाळगून पुढील शिक्षणासाठी तो लिंकन विद्यापीठ गाठतो.
Nimbalkar Farm New Zealand
Nimbalkar Farm New ZealandAgrowon
Published on
Updated on

Dairy Industry : मी समीर सुभाष निंबाळकर, संचालक आणि सहसंस्थापक निंबाळकर फार्म्स लि. न्यूझीलंड.. मी, माझी पत्नी राधा आणि मुलगी नंदिनी १५ वर्षांपासून न्यूझीलंडमधील साऊथ आयलॅंड भागात राहतोय. गेली १३ वर्षे मी आणि राधा इथे डेअरी व्यवसायामध्ये आहोत, खरंतर अजूनही शिकतोय. आमच्या इथपर्यंतच्या प्रवासाकडे मागे वळून बघितल्यावर कधी कधी माझं मलाच आश्‍चर्य वाटतं!...

माझा जन्म मुंबईतील घाटकोपरमधील मध्यमवर्गीय घरातील. लहानपणापासून शहरी वातावरणात वाढल्याने शेतीशी काहीही संबंध नव्हता. पण मला लहानपणापासूनच निसर्ग आणि जनावरांबद्दल जाणून घेण्याची आवड होती. त्यामुळे बारावीनंतर मी पशुविज्ञान विषयात शिक्षण घेण्याचे ठरविले. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिकताना सुरूवातीची वर्षे आपण पुढील आयुष्यात नेमके काय करणार आहोत? याचा मी फारसा विचार केला नव्हता.

Nimbalkar Farm New Zealand
Dairy Farming : डोंगराळ, जंगलमय करूळची दुग्ध व्यवसायात आघाडी

शिकताना जाणवू लागलं, की पुस्तकी औषधशास्त्र, उपचार पद्धतीच्या अभ्यासात फारशी रुची नाही. दरम्यान, याच महाविद्यालयामध्ये राधाची भेट झाली. आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. राधाला सगळेच विषय आवडायचे. मला मात्र पशू उत्पादन व्यवस्थापन या एकाच विषयामध्ये आवड तयार झाली. महाविद्यालयात शिकत असताना गोरेगावच्या आरे कॉलनीमधील पशू प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिकांसाठी जावे लागत असे.

तेथे असलेल्या न्यूझीलंड होस्टेलमध्ये गेलो असताना मला न्यूझीलंडमधील डेअरी उद्योगाची माहिती मिळाली आणि मी भारावून गेलो. तातडीने इंटरनेटवरून न्यूझीलंडमध्ये डेअरी उद्योग नेमका कशा पद्धतीने केला जातो, त्याची वैशिष्ट्ये कोणती याची माहिती शोधण्यास सुरूवात केली. एकेदिवशी महाविद्यालयामध्ये परदेशात स्थायिक झालेले काही माजी विद्यार्थी आले होते. त्यामध्ये एक विद्यार्थिनी न्यूझीलंडमध्ये डेअरी उद्योगात कार्यरत होती.

Nimbalkar Farm New Zealand
Animal Husbandry and Dairying Department : पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना

चर्चेमध्ये न्यूझीलंडमधील डेअरी उद्योग आणि तंत्रज्ञानाबद्दल दिलेल्या माहितीमुळे मी आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे यापुढील शिक्षण न्यूझीलंडमध्ये डेअरी उद्योगाबाबतच घ्यायचे. तसा मी मुंबईमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील, त्यामुळे माझ्या निर्णयावर प्रतिक्रिया देखील अपेक्षित अशाच होत्या. परदेशी शिक्षणाबाबत कुटुंबात घनघोर चर्चा झाली. शिक्षणाला किती पैसे लागणार, सुरूवात कोठून करणार आणि तेथे गेल्यावर राहणार कोठे?

कारण न्यूझीलंडमध्ये कोणी माझे काका, मामा राहत नव्हते. एकच पर्याय उपलब्ध होता तो म्हणजे, तेथील विद्यापीठात रीतसर प्रवेश घ्यायचा. तेथे कमीत कमी नऊ महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला, की स्टुडंट व्हिसा हा ओपन वर्क व्हिसामध्ये बदलता येत असल्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध होणार होती. न्यूझीलंडमधील लिंकन विद्यापीठात मी प्रवेश घेण्याचे ठरले. येथील शैक्षणिक फी होती २८,००० न्यूझीलंड डॉलर.

याचबरोबरीने विमान तिकीट, सुरूवातीचा राहण्याचा खर्च, जेवणखाण आणि तेथील थंडी लक्षात घेता गरम कपड्यांची खरेदी असा सगळा खर्च लक्षात घेऊन मी बॅंकेतून शिक्षणासाठी उपलब्ध होणारे तेरा लाखांचे कर्ज काढले. न्यूझीलंडला पोहोचल्यावर तिथे आठवड्याला वीस तास पार्टटाइम नोकरी करून रोजचा खर्च भागविण्यासाठी लागणारी रक्कम जमा करू शकतो, अशी माहिती मिळाली होती. तोच एक मला थोडा समाधानाचा मुद्दा होता.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com