Dairy Farming : ‘वसुधारा‘ने घडविली धवल क्रांती

Diwali Article 2024 : उमरखेड (जि. यवतमाळ) लगतचा काही भाग अतिदुर्गम आहे. या भागात अलिपूर (गुजरात) येथील वलसाड जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने शेतकऱ्यांना सोबत घेत धवलक्रांती घडवून आणली आहे.
Dairy Farming
Dairy FarmingAgrowon
Published on
Updated on

Dairy Business Success Story : ‘‘पतीला अर्धांगवायूचा झटका आला. परिणामी ते अंथरुणाला खिळले. कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनास सुरुवात केली. आज ‘वसुधारा‘च्या माध्यमातून गावामध्ये दूध खरेदी होते. त्यामुळे मोठा आर्थिक आधार झाला’’... हे सांगताना विडूळ गावातील नीलावती भगवानअप्पा आलमे भावनिक झाल्या होत्या. ‘वसुधारा’ची ही चळवळ नीलावतींप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यातील अनेक महिला, पुरुष शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली आहे.

‘वसुधारा‘ने दिली दिशा...

‘अमूल पॅटर्न’अंतर्गत २२ सहकारी संघ आहेत. या सहकारी संघांचे मिळून ‘अमूल’ फेडरेशन आहे. २००९ पर्यंत अमूलकडून गुजरातमध्ये दुधाची खरेदी होत होती. त्यानंतरच्या काळात इतर राज्यात अमूल अंतर्गत असलेल्या विविध संघांनी दूध खरेदीस सुरुवात केली. महाराष्ट्रातील दूध संकलनाची जबाबदारी वलसाड जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. (वसुधारा) यांच्याकडे आहे. धुळे, त्यानंतर नाशिक आणि २०१४ मध्ये उमरखेड (यवतमाळ) या भागात दुधाची खरेदी या संघातर्फे व्हावी यासाठी रूपेश आडे, किसन जाधव, आमदार विजय खडसे यांनी पुढाकार घेतला.

Dairy Farming
Dairy Farming : डोंगराळ, जंगलमय करूळची दुग्ध व्यवसायात आघाडी

त्याला प्रतिसाद देत वलसाड जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी यवतमाळ जिल्ह्याचे सर्व्हेक्षण केले. त्याआधारे आर्थिक व्यवहार्यता तपासून ११ नोव्हेंबर २०१४ रोजी दूध खरेदीस सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात २,७०० लिटर दुधाची खरेदी होत होती. या भागातील जुन्या डेअरी व्यावसायिकांकडून म्हशीच्या दुधाला ३४ ते ३६ रुपये आणि गाईच्या दुधाला १८ रुपये प्रति लिटर दर मिळत होता. मात्र ‘वसुधारा’कडून म्हशीच्या दुधाला ४० रुपये आणि गाईच्या दुधाला २४ रुपये प्रति लिटर दर मिळू लागल्याने पशुपालकांना आर्थिक फायदा होऊ लागला.

Dairy Farming
Dairy Business : आईच्या शिकवणीमुळेच दुग्धव्यवसायात प्रगती

दूध संकलनाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावात पशुपालकांची संस्था तयार करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायस्तरावर बैठका घेण्यात आल्या. त्यांना अमूलचा उद्देश समजावून सांगण्यात आला. त्यांच्या संमतीनंतर ७ आणि ९ या संख्येत संचालक मंडळ तयार करून अध्यक्ष, सचिवांची निवड झाली. त्यांनी संस्थेमध्ये किमान वर्षभर दूध घातले पाहिजे, अशी अट आहे. नियमित दूध देणाऱ्या सभासदांना संस्थेच्या उत्पन्नातील लाभांश आर्थिक वर्षअखेरीस दिला जातो. या वर्षाअखेरीस ८५ लाख रुपये संघाकडून विविध संस्थांना वितरित केले जाणार आहेत.

२०१४ मध्ये नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात केवळ २२ संस्थांची स्थापना झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या कामाचा विस्तार वाशीम, हिंगोली जिल्ह्यात झाला. सध्या चार जिल्ह्यांतील १४ तालुक्‍यांमध्ये १५४ गावांतून दुधाचे संकलन केले जाते. या प्रकल्पामध्ये गावात दूध उत्पादकांची संस्था, तालुका, जिल्हा संघ त्यानंतर फेडरेशन अशी त्रिस्तरीय रचना आहे. हिंगोली जिल्ह्यात संघातर्फे शीतकरण केंद्र उभारण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com