Agricultural Success : सततच्या दुष्काळी स्थितीमुळे उत्पन्नाची जोखीम वाढली आहे. ती कमी करण्यासाठी सिंचन स्रोतांचे बळकटीकरण करून परभणी जिल्ह्यातील शेतकरी ताजे उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला पिकांकडे वळले आहेत.
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात तुलनेने अधिक सिंचनासाठी उपलब्ध असते. त्यामुळे परभणी तालुक्यातील या भागाची भाजीपाला उत्पादक पट्टा म्हणून ओळख तयार झाली आहे.
येथील शेतकरी वेलवर्गीय, शेंगवर्गीय, कंदवर्गीयसह पालेभाज्यांचे बारमाही उत्पादन घेतात. बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. पैठण येथील जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा जमा झाला की सिंचनासाठी पाण्याची चिंता मिटते.
श्रावणातील मागणी व उत्पादन
परभणी तालुक्यातील शेतकरी पाण्याच्या उपलब्धेनुसार तसेच वर्षभरातील विविध सण, ऋतू या अनुषंगाने बाजारपेठेतील मागणी विचारात घेऊन बारा महिने विविध भाजीपाल्यांच्या लागवडीचे नियोजन करतात. जून महिन्यात लागवड केलेला भाजीपाला श्रावणाच्या हंगामात विक्रीसाठी उपलब्ध होतो.
त्यात मुळा, काकडी, दोडके, कारले, हिरवी मिरची, गवार, चवळी, वाल, भेंडी, पारसे दोडके, दुधी भोपळा, देवडांगर, काशीफळ, फ्लॉवर, कोबी, पालक, शेपू, टोमॅटो, ढोबळी मिरची आदींचा समावेश असतो. श्रावणात उपवासाचे दिवस असतात. त्यादृष्टीने यातील काही विशिष्ट भाज्यांना अधिक मागणी असते.
थेट विक्री करतात शेतकरी
विविध ठिकाणचे आठवडे बाजार तसेच परभणी शहरात शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्था तयार केली आहे. परभणी शहरापासून १० ते १५ किलोमीटर अंतरावरील गावांमधील अल्पभूधारक शेतकरी छोट्या छोट्या क्षेत्रावर दोन ते २० गुंठे क्षेत्रावर विविध भाज्या घेतात.
इटलापूर, बोरवंड, मिरखेल, खानापूर, देशमुख पिंपरी, दैठणा, शिर्शी, सहजपूर, जवळा, ब्रह्मपुरी, उमरी, मांडाखळी, उजळंबा, बाभळगाव आदी काही गावांचा उल्लेख येथे करता येईल. सिंगणापूर हे जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनासाठी सर्वांत प्रसिद्ध गाव आहे.
या सर्व गावांमधील शेतकरी दररोज सकाळी तसेच सायंकाळी परभणी शहरात वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतः थेट विक्री करतात. त्यामुळे नफा शिल्लक रहातो.
मोठ्या क्षेत्रावर उत्पादन घेणारे शेतकरी परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शेतमाल विक्रीसाठी नेतात. आदल्या दिवशी काढणी, स्वच्छता, प्रतवारी केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी क्रेटमध्ये भरून गावातून जाणाऱ्या वाहनांद्वारे बाजारात माल पाठविला जातो.
शेतकऱ्यांचे अनुभव
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.