Maize Variety : ‘पंदेकृवि’चे हेक्टरी १०१ क्विंटल उत्पादन देणारे मका वाण विकसित

Maize Production : मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘पीडीकेव्ही आरंभ’ (बीएमएच १८-२) हा वाण तयार केला आहे.
Maize Variety
Maize VarietyAgrowon
Published on
Updated on

Akola News : मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘पीडीकेव्ही आरंभ’ (बीएमएच १८-२) हा वाण तयार केला आहे. गेल्या महिन्यातील कृषी विद्यापीठे संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या सभेत हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. हा वाण हेक्टरी १०१ क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या या सभेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विविध पिकांचे पाच सुधारित वाण, सहा कृषियंत्रे व ५८ उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी प्रसारित झाल्या आहेत. यामध्ये मका तसेच लसणाचा नवीन वाण प्रसारित झाला. ‘पीडीकेव्ही आरंभ’ या वाणाची खरिपासाठी शिफारस आहे.

Maize Variety
Maize Market : बाजार समित्यांत मक्याची आवक निम्म्याने घटली

त्याचे उत्पादन, कडबा उत्पादन अधिक मिळते. हा वाण ९५ ते १०० दिवसांत परिपक्व होतो. कोरडवाहू क्षेत्रात पेरणी करता येते. शिवाय करपा रोगास मध्यम प्रतिकारक आहे. खोड कीड, अमेरिकन लष्करी अळीच्या पानांच्या नुकसानीसाठी मध्यम प्रतिकारक आहे. ‘राजर्षी’, ‘फुले महर्षि’, ‘राष्ट्रीय वाण बायो’ या तिघांपेक्षाही ‘पंदेकृवि’च्या या वाणाची उत्पादकता जास्त आहे, असा दावा करण्यात आला आहे.

लसूणही येणार हेक्टरी ११९ क्विंटल

‘पंदेकृवि’ने ‘पीडीकेव्ही पूर्णा’ (एकेजी-०७) हा लसणाचा वाण देखील प्रसारित केला आहे. याची उत्पादकता हेक्टरी ११९.६२ क्विंटल आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाचे सरासरी २१ ग्राम वजनाचे गाठे तयार होतात. १०३ ते १३५ दिवसांत हा वाण तयार होतो, असा ‘पंदेकृवि’चा दावा आहे.

Maize Variety
Maize Sowing : मका पेरणीसाठी देवळ्यात टोकन यंत्राचा उपयोग

इतर प्रसारित वाण

‘पंदेकृवि’ने राळा पिकाचा ‘पीडीकेव्ही यशश्री’ (बीएफटीएस ८२) हा वाण प्रसारित केला. याची हेक्टरी उत्पादकता २३.२४ क्विंटल आहे. सूर्यफुलाचा ‘पीडीकेव्ही सूरज’ (पीडीकेव्ही एसएच ९६४) हा वाण हेक्टरी १८ ते २२ क्विंटल उत्पादन देऊ शकतो. ‘पीडीकेव्ही प्रताप’ (एकेडब्ल्यूए-१) या नावाचा कवठाचा वाणही प्रसारित केला आहे.

नवीन कृषियंत्रे अशी...

- बॅटरीचलित वाहनावर आरोहित ‘पंदेकृवि’ फवारणी यंत्र

- कृषी अवशेषांपासून उच्च मूल्याच्या बायोचारमध्ये रूपांतरित करणारे व सतत चालणारे यंत्र

- ‘पंदेकृवि’ सीताफळ साल व गर विलगीकरण यंत्र

- ‘पंदेकृवि’ कवठ फळ कापणी यंत्र

- सौरऊर्जाचलित प्राणी प्रतिबंधक यंत्र

- पिकांवरील कीड व्यवस्थापनासाठी बहुउद्देशीय कामगंध अधिक प्रकाश आणि कामगंध अधिक चिकट अधिक प्रकाश (एकत्रित) कीटक सापळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com