Rural Development: एकीच्या बळावर प्रगतीच्या वाटेवर नागीचा माउली गट

Agriculture Success Story: वाशीम जिल्ह्यातील नागी गावातील शेतकऱ्यांनी सामूहिकतेच्या ताकदीवर 'माउली' शेतकरी गटाची स्थापना केली. सुधारित शेती, जलसंधारण व सामाजिक कार्यांनी त्यांनी गावाचा कायापालट घडवून आणला आहे.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Mauli Farmer Group: वाशीम जिल्ह्यातील नागी (ता. मंगरूळपीर) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत माउली शेतकरी गटाचा स्थापना केली. त्यातून सुधारित शेती पद्धती, जलसंधारण व अन्य विकासकामांना गती दिली. पानी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत राज्यस्तरीय तिसरा क्रमांक मिळवण्याचा बहुमान या गटाने प्राप्त केला आहे. गावपरिसरातील अन्य शेतकऱ्यांनाही या गटशेतीची प्रेरणा मिळून गटांची चळवळ उभी राहिली आहे.

वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात नागी हे हजार लोकसंख्येच्याही आतील गाव आहे. सुमारे तीनशे एकरांचे क्षेत्र गावाला असून, येथील शेतकरी प्रयोगशील आणि जिद्दी आहेत. स्वतःचा विकास स्वतःच्या हातात या उक्तीचा पुरेपूर अनुभव गावात पाहण्यास मिळतो. पानी फाउंडेशनच्या पुढाकाराने नागी गावात गटशेतीचा प्रसार होण्यास मदत झाली. नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री ही शेतकरी कंपनी व

कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांची प्रेरणा गावातील शेतकऱ्यांना मिळाली. चार जणांना गटशेतीच्या प्रशिक्षणाची संधी मिळाली. पण एकत्र येऊन काम करण्याची संकल्पना यशस्वी होईल की नाही याबाबत मनात संभ्रम होता. कारण आजकाल शेताच्या धुऱ्यांवरून, वाद आहेत. भावाभावांत मालमत्ता, जागेवरून कलह आहेत. मात्र जसजसे प्रशिक्षण पुढे गेले तसतसा संबंधित शेतकऱ्यांच्या मनात सामूहिक क्षमतेविषयी आत्मविश्‍वास वाढत गेला. प्रशिक्षणानंतर या चौघा सदस्यांनी दीड महिना पायपीट करीत परिसरातील एकेक शेतकरी जोडला. त्यातून २०२२ मध्ये माउली शेतकरी गट उभा राहिला.

Agriculture
Agriculture Success Story: पालकरांकडील आंब्याला मिळालेय जागेवरच मार्केट

बदलांची नांदी

नागी गावचे विजय राऊत माउली गटाचे अध्यक्ष आहेत. गटात सुमारे १२ सदस्य आहेत. आज याच गटाला गावातील प्रगती विजय या युवा शेतकऱ्यांच्या गटाचे सहकार्य मिळते आहे. माउली गटाचे सदस्य एकत्रितपणे सोयाबीन व अन्य पिकांसाठी बियाणे, खते व अन्य साहित्यांची खरेदी सामूहिक करू लागले. त्यातून मोठी आर्थिक बचत होऊ लागली. नागी शिवारात पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळे जमीन दरवर्षी चिभडते. शेतीशाळेत बीबीएफ पद्धत व पट्टा पद्धतीने पेरणी करण्याचे मार्गदर्शन मिळाले.

सोयाबीनच्या फुले संगम वाणाची निवड करून गटातील सदस्यांनी त्याची पेरणी केली. हा सुधारित लागवड तंत्र पद्धतीच्या वाटचालीचा प्रारंभ ठरला. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, चिकट सापळे, कामगंध सापळे, पक्षी थांबे यांचा वापर होऊ लागला. त्यातून रासायनिक निविष्ठांचा वापर व त्यावरील खर्चात बचत होऊ लागली. पूर्वी एकरी सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे गटातील शेतकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ लागले.

Agriculture
Agriculture Success Story: तामशीने मिळवली प्रगतिशील शेतीत ओळख

इतरांसाठी प्रेरक काम

माउली गटाचा प्रवास आता संत्रा, चियासीड, कांदा बीजोत्पादन, टरबूज, भाजीपाला आदींच्या सुधारित शेतीकडे सुरू झाला आहे. गटाच्या कार्याची दखल घेत कृषी विभागाने आपल्या मूल्यसाखळी योजनेत त्यास समाविष्ट केले आहे. यातून गटाने एकात्मिक कीड व्यवस्थापनात काम सुरू केले आहे. शेती बरोबरच सामाजिक, जलसंधारणाच्या कामांमध्येही गटाची आघाडी आहे. गटाने हाती घेतले म्हणजे हे काम झालेच असा विश्वास तयार झाला आहे.

या गटाची प्रेरणा घेऊन गावात आणखी दोन गटांची स्थापना झाली. त्यांचे काम पाहण्यासाठी अन्य गावातूंन शेतकरी येऊ लागले. नांदखेडा गावचे सुशीलकुमार मनवर, पिंपरी अवगणचे सचिन अवगण,मोहरीचे गोपाल मिसाळ यांच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांनी याच प्रेरणेतून पुढे येत आपापल्या गावात गटांची स्थापना केली. स्वराज्य शेतकरी गट (नांदखेडा), माँ जगदंबा शेतकरी गट (मोहरी) तर उत्कृष्ट शेतकरी गट ‘आमची माती आमची माणसं’ गट (पिंप्री अवगण) यांच्या एकत्रित ट्रॅक्टर खरेदीची दखल महाराष्ट्रातील शेतकरी गटांनी घेतली आहे.

मान्यवरांच्या भेटी

अनेक मान्यवरांनी नागी गटाला भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, विभागीय समन्वयक उज्वल बोलवार, तालुका समन्वयक सुभाष गवई, तालुका प्रशिक्षक मेघाताई चौधरी, तालुका प्रशिक्षक शुभम पंचभाई, कृषी विभागाचे तत्कालीन सचिव एकनाथ डवले, ‘सह्याद्री’चे विलास शिंदे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. सचिन महाजन, डी. एल. मोहिते, नीती आयोग तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे पथका, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, विद्यमान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह आदींचा त्यात समावेश आहे.

विजय राऊत, ७८७५३६८१७७

(अध्यक्ष, ‘माउली’ गट, नागी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com