Mundkhed Flower Farming: मुदखेडच्या फुलांचा महानगरात दरवळ

नांदेड जिल्ह्यातील बारमाही पाण्याची व्यवस्था असलेल्या मुदखेड तालुक्यामधील काही ठरावीक गावातील शेतकऱ्यांनी फुलशेतीची कास धरली आहे. त्यातून रोज व नियमित उत्पन्नांसोबतच अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
Mundkhed Flowers
Mundkhed FlowersAgrowon
Published on
Updated on

कृष्णा जोमेगावकर
नांदेड जिल्ह्यातील बारमाही पाण्याची व्यवस्था असलेल्या मुदखेड (Mundkhed) तालुक्यामधील काही ठरावीक गावातील शेतकऱ्यांनी फुलशेतीची (Flower Farming) कास धरली आहे. त्यातून रोज व नियमित उत्पन्नांसोबतच अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. या फुलांची विक्री नांदेडसह निजामाबाद, हैदराबाद, अमरावती, नागपूर या महानगरांत केली जात असल्याने मुदखेडच्या फुलांचा दरवळ महानगरांपर्यंत पोहोचला आहे.

Mundkhed Flowers
Flower Farming : फुलशेतीच्या बळावर फुलवला संसार

नांदेड जिल्ह्यात जिरायती, बागायती शेतीसोबतच भाजीपाला व फळपिकांची लागवड शेतकरी करतात. शेतीमालाचा अनिश्‍चित बाजार, नेसर्गिक संकटामुळे बागायती व फळबांगाचे होणारे नुकसान नित्याचे झाल्याने शेतकरी पर्यायी पिकांची निवड करत आहेत. यातच रेल्वे जंक्शन असलेल्या मुदखेड तालुक्यात सिंचनाची चांगली सोय असलेल्या मेंढका, वाडीमुक्ताजी, मुक्त्यापुरवाडी, खांबाळा व मुदखेडमध्ये अनेक वर्षांपासून फुलशेतीची परंपरा आहे. येथे प्रामुख्याने काकडा, मोगरा, गुलाब, शेवंती, झेंडू, निशिगंध इ. फुलांची मोठी लागवड केली जाते.

Mundkhed Flowers
Flower Farming : पुष्पोत्पादनाला मिळणार 'बुस्टर'

मेंढका येथे गुलाबाच्या विविध जातीची लागवड केली जाते. हा गुलाब प्रामुख्याने नांदेड व अन्य शहरात जातो. लग्नसराई, सण समारंभ या काळात गुलाबांची मागणी वाढून हजार रुपये प्रति किलोपर्यंत दर जात असल्याचे सांगतात. घरखर्च भागतो. गुलाबाला सरासरी शंभर ते दोनशे रुपये गड्डी असा दर मिळतो. यातून ताजे पैसे मिळत असल्याने घरखर्च भागत असल्याचे मेंढका येथील शेतकरी गंगाधर चंदलवाड यांनी सांगितले.

Mundkhed Flowers
Flower Farming : पुष्पोत्पादनाला मिळणार 'बुस्टर'

प्रत्येकाच्या घरी फुलशेती...
१) वाडीमुक्ताजी व मुक्त्यारपूरवाडी येथील जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे मोगरा व काकडा या फुलांची लागवड आहे. क्षेत्र दहा गुंठ्यांपासून पाच एकरांपर्यंत असून, एकदा लागवड केल्यानंतर ही फुलझाडे दहा वर्षांपर्यंत उत्पादन देतात. प्रतिकिलो पन्नास रुपये या प्रमाणे मजुरी देऊन मजुरांकडून सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंत फुलांची तोडणी होते. नांदेड येथील हिंगोली गेट उड्डाण पुलाखाली फुलांचा ठोक बाजार भरतो.

येथून ही फुले नागपूर, अमरावती, निजामाबाद, हैदराबाद अशा महानगरांत जातात. आवक आणि मागणीनुसार दर कमी जास्त होतात. मोगरा व काकडा ही फुले फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांपर्यंत चालतात. या काळात लग्नसराई असल्याने प्रतिकिलो दीड हजार रुपयांपर्यंतही दर मिळतो. सरासरी दोनशे ते तीनशे रुपये दर शेतकऱ्यांना मिळत असल्याची माहिती वाडीमुक्ताजी येथील वसंत इंगोले, इरबाजी इंगोले या शेतकऱ्यांनी दिली.

२) काकडा, मोगरा या फुलांप्रमाणेच शेवंती, निशीगंध, गलांडा, झेंडूची वर्षभर लागवड असते. त्यामुळे एक नाही, तर दुसऱ्या फुलांचा चांगला दर मिळून जात असल्याचे वाडीमुक्त्यारपूर येथील माणिक गणेशराव देशमुख यांनी सांगितले.
३) या गावामध्ये आसपासच्या मजुरांनाही हमखास काम उपलब्ध असते. फुले तोडणीसाठी ५० रुपये प्रतिकिलो मजुरी अशी नियमित मजुरी दिली जाते.


फुलांना मिळणार सरासरी दर (दर प्रति किलो रुपयांत)
मोगरा......२०० ते ३००
काकडा....१५० ते ३००
गुलाब.....१०० ते २००
निशिगंध..१०० ते १५०
शेवंती.....१०० ते १२५

दीडशे ते दोनशे हेक्टरवर फुलशेती
१) मुदखेड तालुक्यात केळी, हळद ही बागायती पिके प्रामुख्याने घेतली जातात. यासोबतच बाजारपेठ, रेल्वेसुविधा असल्यामुळे या तालुक्यातील मेंढका, वाडीमुक्ताजी, मुक्त्यापूरवाडी, ल्याहळी, खांबाळा व मुदखेड शिवारात फुलशेती केली जाते. तालुक्यात दीडशे ते दोनशे हेक्टरवर फुलांची लागवड आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सचिन कपाळे यांनी दिली.

२) फुलशेतीमुळे शेतकऱ्याहाती नगदी पैसे येत असल्याने अन्य कोणत्याही शेती व पूरक व्यवसायापेक्षा येथील शेतकऱ्यांना फुलशेतीत अधिक रस असल्याची माहिती आत्माचे बीटीएम विकास गिते यांनी दिली.
३) पूर्वी शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून फुलबाग लागवडीची सुविधा होती. मात्र शासनाने २०२२ मध्ये फुलबाग लागवडीविषयीचा आदेश रद्द केल्याने त्यांना लाभ मिळेनासा झाला. ही सुविधा पुन्हा उपलब्ध उपलब्ध व्हावी, अशी मागणी शेतकरी करत असल्याचे कृषी अधिकारी सुनील पुरी सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com