Marigold Flower Price : टोमॅटो, कांद्यानंतर आता झेंडू रस्त्यावर फेकण्याची वेळ; सणासुदीत दर पडल्याने शेतकरी चिंतेत

Maharashtra Flower : महाराष्ट्रातील सर्वच बाजार पेठांमध्ये झेंडूला अवघ १० ते २० रुपये किलो दर असल्याने शेतकऱ्याला झेंडू फेकून देण्याची वेळ आली आहे.
Marigold Flower Price
Marigold Flower Priceagrowon
Published on
Updated on

Zendu Flower News : कोणत्याही सणात आनंद भरण्यासाठी झेंडूच्या फुलांची आपल्याला गरज भासत असते. परंतु झेंडूची फूले बाजारात येईपर्यंत शेतकरी प्रचंड राबत असतो दोन महिन्यानंतर झेंडूची फुले काढणीला सुरूवात होते. यंदा दसऱ्यात झेंडूला दर नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वच बाजार पेठांमध्ये झेंडूला अवघ १० ते २० रुपये किलो दर असल्याने शेतकऱ्याला झेंडू फेकून देण्याची वेळ आली आहे.

दरम्यान राज्यात टोमॅटो, कांद्यानंतर आता फुल उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत यामुळे फुलांची मोठी आवक होत असते परंतु बाजारात झेंडूसह अन्य फुलांनाही दर नसल्याने शेतकऱ्यांना फुले फेकुन देण्याची वेळ आली आहे.

यावर्षी भाव घसरल्यामुळे तसेच ऑक्टोबर हीटचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. उत्पादन जास्त व ग्राहक कमी असल्यामुळे शिल्लक फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचे चित्र राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.

घर, दुकान व वाहनांवर दसऱ्याच्या दिवशी फुलांचे तोरण लागावे यासाठी शेतकरी तीन महिने शेतात दिवसरात्र कष्ट घेतात. पण ऐन सणासुदीच्या काळातच दर पडल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वत:च फुलांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

Marigold Flower Price
Kolhapur Rabi Season : कोल्हापूर जिल्ह्याचे रब्बीचे क्षेत्र कमी होणार, कृषी विभागाने जाहीर केली माहिती

गतवर्षी दसऱ्याला १५० ते २०० रुपये किलो असा झेंडूला भाव मिळाला होता. यावर्षी उत्पादन जास्त असल्यामुळे भाव कोसळून ३० ते ५० रुपये किलो झाले आहेत. तर पाऊस नसल्याने फुले लवकर कोमेजून जात आहेत. दर नसल्याने अनेक शेतकरी सहकुटुंब फुलांची विक्री करत असताना दिसत होते.

तर व्यापाऱ्यांना फुले देण्यापेक्षा स्वतः विक्री केल्यास अधिक फायदा होतो. यामुळे प्रत्येक वर्षी दसरा व दिवाळीला शेतकरी फूलविक्री करतात परंतू फुलांना दर नसल्याने अपेक्षीत फायदा झाला नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com