Food Processing : विद्यापीठाच्या प्रक्रिया युनिटमध्ये करा उत्पादनांची निर्मिती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अन्न तंत्र महाविद्यालय आणि सायाळा (जि. परभणी) येथील कंपनी यांच्या भागीदारीतून प्रक्रियायुक्त उत्पादने उद्योगाची उभारणी झाली आहे.
Product Manufacturing
Product ManufacturingAgrowon

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत (Vasantrao Naik Marathwada Agricultural University) अन्न तंत्र महाविद्यालय हे १९७६ मध्ये स्थापन झालेले देशातील पहिले शासकीय अन्न तंत्र महाविद्यालय आहे. ४५ वर्षांच्या वाटचालीत महाविद्यालयाद्वारे देश- परदेशात शेकडो यशस्वी अन्न प्रक्रिया उद्योजक घडले आहेत.

शेतकरी व महिला स्वयंसहायता बचत गटांनाही उद्योजकतेचे प्रशिक्षण दिले जाते. कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयामध्ये नवउद्योजकांसाठी ‘कॉमन इनक्युबेशन सेंटर’चे (सामाईक पायाभूत सुविधा केंद्र) उभारणीचे काम सुरू झाले आहे.

भागीदारीतील उद्योग

विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक सुविधा म्हणून महाविद्यालयात फळे व भाजीपाल्यांवर प्रक्रिया करणारे युनिट कार्यरत आहे. प्रति दिन पाचशे किलो अशी त्याची क्षमता आहे. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थी येथे त्याचा लाभ घेत असत. त्यानंतरच्या कालावधीत युनिट बंद राहायचे.

या युनिटचा उद्योजकांनाही फायदा व्हावा यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांनी सार्वजनिक- खासगी भागीदारीतून (पीपीपी) येथे प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला.

माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या कार्यकाळात २०२०-२१ मध्ये सायाळा (ता. परभणी) येथील कांताबाई एकनाथराव खटिंग यांच्या ‘व्ही क्यूब फ्रेश’ या कंपनीसोबत यानुसार प्रकल्प सुरू झाला.

Product Manufacturing
Vasantrao Naik Award : ‘शेती शोध आणि बोध’ला वसंतराव नाईक पुरस्कार

...असा सुरू आहे प्रकल्प

खटिंग यांची १५ एकर शेती आहे. हळद, भाजीपाला, आवळा, पपई व अन्य पिके ते घेतात. मूल्यवर्धनातून उत्पन्नात वाढ होते ही बाब लक्षात घेऊन त्यांनी महाविद्यालयाच्या फळे- भाजीपाला प्रक्रिया व बेकरी युनिटमध्ये उत्पादने निर्मिती सुरू केली आहे.

कांताबाई यांचे चिरंजीव लक्ष्मण कृषी विभागात कार्यरत आहेत. या उद्योगासाठी त्यांच्यासह पुतणे माधव यांची मदत होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. कैलास गाडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. याच महाविद्यालयातून वैष्णवी लांडे या विद्यार्थिनीने २०२० मध्ये ‘बी टेक’ची पदवी घेतली. आज ती या प्रकल्पात अन्न तंत्रज्ञ म्हणून रुजू झाली असून, तिलाही प्रत्यक्ष कार्याचा अनुभव मिळतो आहे.

युनिटमधील यंत्रसामग्री

पल्प, स्टीम जॅकेटेड केटल, क्रशर, बॉटल फिलिंग मशिन, पिकल मिक्सर, फ्रूट ॲण्ड व्हेजिटेबल वॉशर, बेकरी युनिटची व पपया टुटी फ्रूटी निर्मिती यंत्रे.

उत्पादने

आवळा कॅण्डी व ज्यूस, (शुगर फ्री, पेरू ज्यूस, जांभूळ व पेरू मिक्स ज्यूस, टोमॅटो केचप, मँगो ज्यूस, पपया टूटी फ्रुटी, ओल्या हळदीचे व लिंबाचे लोणचे.

बेकरी उत्पादने- ब्रेड, लादी पाव, टोस्ट (ब्राऊन, मावा व फ्रूट), कुकीज (चॉकलेट व ड्रायफ्रूट), खारी, क्रीम रोल, पफ (व्हेज व अंडा)

दर प्रातिनिधिक (रुपये)

-आवळा कॅण्डी- प्रति किलो ३२०, पेरू, आवळा ज्यूस प्रति लिटर १००, हळद लोणचे ५०० (प्रति किलो), टोमॅटो केचप १२० (प्रति किलो), मावा टोस्ट ४० प्रति किलो, कुकीज प्रति २०० ग्रॅम ८० रु.

-लागणारा कच्चा माल उदा. हळद, आवळा, पपई, टोमॅटो हे खटिंग यांच्या घरच्या शेतातील असतात. पेरू, जांभूळ यांसह बेकरीसाठी आवश्यक मैदा आदी घटक स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केले जातात. उद्योगातून १२ व्यक्तींना रोजगार मिळाला आहे.

विक्री व्यवस्था व अर्थकारण

व्ही क्यूब फ्रेश ब्रॅन्डने उत्पादनांची विक्री होते. ठोक व किरकोळ विक्रेते नेमले आहेत. विद्यापीठाच्या विक्री केंद्रावरून तसेच थेट ग्राहकांनाही विक्री होते. परभणी शहरासह जिंतूर, गंगाखेड, वसमत आदी तालुक्यांच्या ठिकाणी उत्पादने वितरित होतात. ‘मार्केटिंग’साठी एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे.

उद्योगासाठी राष्ट्रीयीकृत बँकेकडून १८ लाख रुपये कर्ज घेतले आहे. ‘पीपीपी’ करारानुसार महाविद्यालयास वार्षिक भाडे आणि वीजबिल मिळून तीन लाख रुपये द्यावे लागतात. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत अनुदान मंजूर झाले आहे. कोरोना काळातच उद्योग सुरू झाला.

त्या काळात उलाढाल अडीच लाख रुपयांपर्यंत झाली. २०२१, २०२२ या कालावधीत ती सहा लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Product Manufacturing
पानवेलीची उतरण करण्यास वसंत ऋतू अतिशय चांगला

‘ईएलपी’चा फायदा

बी.टेक.(फूड टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी कार्यानुभावातून शिक्षण प्रकल्प (एक्सप्रिमेंटल लर्निंग प्रोजेक्ट -ईएलपी) हा उपक्रम असतो. त्यांच्यात उद्योजकीय तसेच ‘मार्केटिंग’ची कौशल्ये विकसित व्हावीत.

प्रात्यक्षिकांव्दाद्वारे निपुणेतेचे उत्तम मॉडेल तयार व्हावे हा त्यामागील उद्देश असतो. त्यातून विद्यार्थ्यांना प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.

वैष्णवी लांडे ः९११२९४४६०६

लक्ष्मण खटिंग ः८९७५८००९०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com