Khilar Animal Market : जत यात्रेतील खिलार जनावरे बाजाराची सर्वदूर ख्याती

Livestock Market : सांगली जिल्ह्यातील जत येथे दर मार्गशीर्षात भरणारी ‘श्री यल्लम्मादेवी’ची यात्रा व खिलार जनावरांचा बाजार व प्रदर्शन सर्वदूर प्रसिद्ध आहे. शेतीकामांसाठी, शर्यतीसाठीही येथे जनावरे खरेदीसाठी शेतकरी, शर्यत शौकीन आणि व्यापारी यांची मोठी गर्दी असते.
Khilar Market
Khilar MarketAgrowon
Published on
Updated on

Khilar Animal : सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला जत हा दुष्काळी तालुका आहे. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर इथल्या शेतकऱ्यांनी शेतीत प्रगती साधली आहे. तालुक्यात प्रत्येकाच्या दावणीला खिलार जनावरे असतात.

जत शहराच्या दक्षिणेला गंधर्व नदीच्या काठी श्री यल्लमादेवीचे प्राचीन मंदिर आहे. जत ही डफळे संस्थानाची राजधानी आहे. त्या काळापासून प्रत्येक मार्गशीर्षात श्री यल्लम्मादेवीची यात्रा भरते. त्यास दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडूहून भाविक मोठ्या प्रमाणात येतात.

जनावरांच्या बाजाराची परंपरा

मूळ जतचे आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे १९८६ चे सभापती कै. बी. आर. शिंदे व बिळूर गावचे प्रतिष्ठित कै. एन. एस. पाटील समान विचारसरणीतून एकत्र आले. बाजार समितीच्या माध्यमातून यात्रेनिमित्त शेतकऱ्यांच्या हितासाठी जनावरे बाजार आणि प्रदर्शन भरवण्याची संकल्पना त्यांनी मांडली.

त्यानुसार १९८७ पासून श्रीमंत विजयसिंहराजे डफळे, दुय्यम बाजार आवार, जत आणि श्री यल्लम्मादेवी प्रतिष्ठान, जत यांच्या संयुक्त विद्यमाने ही परंपरा सुरू झाली. यंदाही मार्गशीर्षात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सुजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे यशस्वी आयोजन झाले.

Khilar Market
Livestock Allocation Scheme : पशुधन वाटप योजनेचे जाचक निकष

बाजारावर दृष्टिक्षेप

प्रत्येक यात्रेच्या सांगतेवेळी पुढील वर्षाच्या यात्रेची तारीख जाहीर केली जाते. त्यामुळे यात्रेच्या एक दिवस आधीच दूरच्या गावांमधील व राज्यातील पशुपालक जनावरांसह बाजारात दाखल होतात.

यात्रा तीन दिवस चालते. जनावरांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. त्यामुळे विक्रीस आलेल्या जनावरांची माहिती मिळते.

थेट शेतकऱ्यांकडून खरेदी- विक्री. मध्यस्थ नाही.

शर्यतीचे खोंड, वळू, शेतीकामासाठीचे बैल आदींची विविधता.

खरेदी करताना कान, शिंग, बारीक शेपूट, तोंडाला कोसा, चित्रा, काळा हरणा, पांढरा असे रंग पाहिले जातात. कोसा, चित्रा रंगाच्या जनावरास अधिक दर मिळतो.

प्रदर्शनात एक वर्षाआतील, त्यापुढील, दोन, चार, सहा दाती, जुळाखू या वर्गासांठी पहिला, दुसरा, तिसरा, आणि उत्तेजनार्थ असे क्रमांक काढतात.

त्यातून ‘जनरल चॅम्पियन’ची निवड होते. पहिल्या क्रमांकाला चांदीचे नाणे, ढाल, प्रमाणपत्र, दोन हजार रोख रक्कम, ढाल, प्रमाणपत्रासह दुसऱ्या क्रमांकाला अनुक्रमे १५०० रुपये, तिसऱ्या क्रमांकाला, एक हजार रुपये, तर उत्तेजनार्थ ७०० रुपये देण्यात येतात.

आवक- १० ते १५ हजार जनावरे.

पुणे, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, कर्नाटकातील विजापूर, इंडी, जमखंडी, गोकाक, अथणी, विजापूर, बेळगाव येथून येतात पशुपालक.

बाजार समितीला मिळणारा सेस- दीड लाख रु.

Khilar Market
Livestock Market : कार्तिकी यात्रेत तीन वर्षांनी भरला जनावरांचा बाजार

दर (रुपये)

खोंड- ६० हजार ते एक लाख.

शर्यतीचा खोंड- ६ ते ९ लाख

शेतीकामाचे बैल (जोडी)- ३ ते ४ लाख.

वळू- ४ ते ५ लाख

‘लम्पी’नंतरचा मोठा बाजार

गेल्या वर्षभरात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव असल्याने जनावरांच्या बाजारांवर बंदी होती. यंदा येथे यात्रा सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच जनावरे येण्यास प्रारंभ झाला. १० ते १५ हजार जनावरांची आवक तर यात्रेत सुमारे तीन- चार कोटींची उलाढाल झाली असल्याचा अंदाज बाजार समितीने व्यक्त केला.

‘लम्पी’च्या सावटामुळे यंदा जनावरांची संख्या तुलनेने कमी होती. परंतु बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने पुणे जिल्ह्यातील शर्यत शौकीन मोठ्या संख्येने खोंड खरेदीसाठी आले होते. त्यामुळे यंदा त्यांचे दर ३० हजारांपासून ते दीड लाख रुपयांनी वाढले. शेतीकामाच्या बैलांचे दरही १५ हजारांपासून ६० हजारांनी चढे होते. जातिवंत वळूंचीही चांगली खरेदी झाली.

यात्रेत लहानपणापासून येतो. येथे जातिवंत खिलार जनावरे मिळतात. माझ्याकडे धनगरी खिलार जातीचा वळू आहे. त्यास चार ते पाच लाख रुपये दर मिळतो.
चंद्रकांत वगरे ७७३८१९४२१३ गिर्डी, ता. सांगोला, जि. सांगली
खिलार जनावरे संगोपनाची आवड आहे. यंदा चार खोंडे विक्रीस आणली होती. एक जोडीची दीड लाख रुपयांना विक्री केली.
सुरेश माळी, ७७६०९२१००४ बाळेगिरी, ता. अथणी, जि. बेळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com