Saffron Farming : विदर्भाच्या तप्त शिवारात फुलले काश्‍मिरी केशर

Saffron Cultivation : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा निवासी डॉ. अशोक भरणे यांनी काश्मीरसारख्या थंड वातावरणात येणाऱ्या प्रसिद्ध केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. विक्रीही साधली आहे. विदर्भासारख्या उष्णपट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग दिशादर्शक आणि शेतीत नवा आशावाद निर्माण करणारा ठरणारा आहे.
Saffron Farming
Saffron FarmingAgrowon

Kashmiri Kesar Farming : यवतमाळ जिल्ह्यातील मूळ आर्णी- चिखली येथील मात्र सध्या दारव्हा येथे घर असलेले डॉ. अशोक भरणे एमबीबीएस डॉक्टर आहेत. कोरोनाच्या काळानंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर आपल्या गावाकडील शेतीकडे अधिक लक्ष दिले. वयाची साठी पार केलेल्या या तरुणाचा शेतीतील उत्साह प्रेरणादायी आहे.

त्यांनी वेगळी वाट पकडताना काश्मीरमधील प्रसिद्ध केशर उत्पादनाचा प्रयोग करण्याचे ठरविले. फोनवरून हरियाना तसेच पुणे भागातील केशर लागवड यशस्वी केलेल्या कडून अनुभव घेतले. काश्‍मीर येथे दोन वेळा जाऊन व प्रत्येक वेळी १५ ते २० दिवस तेथे राहून केशराची शेती, अनुकूल हवामान अभ्यासले.

Saffron Farming
Saffron Farming : काश्मिरी केशरचे उत्पादन नागपुरात

..असा केला केशरचा प्रयोग

सर्व अभ्यास झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रयोगास सुरुवात झाली. सुमारे ३०० किलो कंद काश्मीरहून आणले. सुरुवातीला ते लाकडी रॅकवर वाढवायचे ठरविले. परंतु त्याला बुरशीचा संसर्ग झाला आणि हा २५ ते ३० हजारांचा खर्च वाया गेला. त्यानंतर मग खिडक्‍यांना लावण्यात येणाऱ्या जाळींचा वापर केला. जाळीवर हे कंद ठेवण्यात येतात.

एरोफोनिक’ पद्धतीने म्हणजे माती व पाणी न वापरता केशरची वाढ करायची होती. त्यादृष्टीने आर्द्रता मिळविण्यासाठी ‘ह्युमिडीफायर’ची गरज होती. मात्र ते विकत न आणता घरचा फॅन व ‘आरओ’ पद्धतीचे पाणी वापरून आर्द्रता तयार केली.

केशर वाढीसाठी २०० चौरस फुटांची जागा व त्यात रॅक सिस्टिम आहे. प्रति रॅकमध्ये पाच शेल्फ आहेत. वनस्पतीच्या वाढीसाठी ग्रोइंग लाइटचा वापर केला. हे एलईडी लाइट्‍स म्हणजे पांढऱ्या, निळ्या व लाल रंगाचे असतात. थंड वातावारणातले हे पीक असल्याने एअर कंडिशनरचा (एसी) वापर केला. मात्र फुलांच्या वाढीच्या काळात ४ ते ० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असल्याने चिलरचा वापर केला. कंदांसह एकूण सर्व ‘सेटअप’साठी सुमारे सहा लाख रुपये खर्च आला.

Saffron Farming
Saffron Farming : महाराष्ट्रात संपूर्ण नियंत्रित पद्धतीने घेतले काश्मिरी केशर

होले दांपत्याचेही केशर उत्पादन

नागपूर येथील अक्षय व दिव्या या होले दांपत्यानेही १५० चौरस फूट क्षेत्रात नऊ लाख रुपये खर्चून केशर शेती केली आहे. अक्षय व्यावसायिक तर दिव्या बॅंकेत कार्यरत आहेत. यंदा त्यांना १६०० ग्रॅम उत्पादन झाले आहे. सहाशे रुपये प्रति ग्रॅम असा विक्रीचा दर त्यांना अपेक्षित आहे. असे प्रयोग विदर्भासाठी नव्या परिवर्तनाची नांदी ठरणारी आहे.

...असे मिळाले उत्पादन

ऑगस्ट ते नोव्हेंबर असे केशरचा पीक कालावधी आहे. सप्टेंबरला लागवड केल्यास नोव्हेंबरमध्ये फुलधारणा होते. फुलात केशरच्या तीन पाकळ्या राहतात. सुमारे ५०० किलो बियाण्यांपासून एक किलोपर्यंत, तर १७० ते १८० फुलांपासून एक ग्रॅम केशर मिळू शकते. व्यवस्थापन व पोषक वातावरण या बाबी जुळून आल्या तरच उत्पादकता होते, असे डॉ. भरणे सांगतात.

विक्रीही यशस्वी

डॉ, भरणे यांना पहिल्या प्रयोगात सुमारे ४२० ग्रॅमपर्यंत केशरचे उत्पादन मिळाले आहे. बहुतांश केशरची विक्री त्यांनी यशस्वी केली असून, त्यास ४०० ते ५०० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. विदर्भात उन्हाळ्यात जिथे ४० ते ४५ अंशांच्या पुढे तापमान जाते त्या भागातील शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग दिशादर्शक होऊ शकतो, असे डॉ. भरणे म्हणतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com