Farm to Home concept : फार्म टू होम' संक ल्पनेचा 'कल्याणी फार्म'

ढाकेफळ (ता.पैठण,जि.औरंगाबाद) येथील अनुराधा उद्धवराव घुगे यांनी मुंबईसारख्या शहरामध्ये 'फार्म टू होम' संकल्पनेतून शेतीमालाची थेट विक्री सुरू केली. विक्रीसाठी त्यांनी'कल्याणी फार्म' हा ब्रॅण्ड तयार केला आहे.
'Kalyani Farm' of 'Farm to Home' concept
'Kalyani Farm' of 'Farm to Home' conceptAgrowon

ढाकेफळ (ता.पैठण,जि.औरंगाबाद) (Dhakefal) शिवारात वडिलोपार्जित शेतीचे अनुराधा उद्धवराव घुगे (Anuradha Ghuge) यांनी चांगले नियोजन केले आहे. मोसंबी, डाळिंब (Pomogranate) , सीताफळ (Custerd Apple) या फळपिकांसह हळद, कांदा, कलिंगड, खरबूज लागवडीवर त्यांचा भर आहे. केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता मुंबईसारख्या शहरामध्ये त्यांनी 'फार्म टू होम' संकल्पनेतून शेतीमालाची थेट विक्री सुरू केली. विक्रीसाठी त्यांनी'कल्याणी फार्म' हा ब्रॅण्ड तयार केला आहे.

'Kalyani Farm' of 'Farm to Home' concept
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम’ उपक्रम 

ढाकेफळ (ता.पैठण,जि.औरंगाबाद) शिवारात असलेल्या वडिलोपार्जित २५ एकर शेतीचे नियोजन अनुराधा घुगे यांनी कुटुंबीयांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने केले आहे. सध्या अनुराधा यांचे पती उद्धवराव घुगे हे मुंबईत अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शेतीची आवड असल्याने अनुराधाताई कुटुंबाची जबाबदारी सांभाळून शेती नियोजनात सहभागी झाल्या आहेत. घुगे यांच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये दहा एकर डाळिंब, सात एकर आधीची आणि तीन एकर नव्याने लावलेली मोसंबी, बांधावर ६०० सीताफळाची झाडे, ३० वर्षांपूर्वीची ५५ नारळाची झाडे, सव्वा एकरात पेरू, चार एकरावर हळद, अर्धा एकरावर आले अशी पीक पद्धती आहे. सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले वडील भगवानराव गुट्टे यांनी जपलेल्या शेतीचा वसा पुढे चालवण्याचा प्रयत्न गेल्या तीन वर्षांपासून अनुराधा घुगे करताहेत. या संपूर्ण शेतीची घडी बसविण्यात आणि जबाबदारी सांभाळण्यात त्यांना पती उद्धवराव घुगे यांच्यासह नातेवाईक विश्वनाथ सानप आदींचे सहकार्य मिळाले आहे. शेतीच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी त्यांनी शेतीवर एक व्यवस्थापक आणि तीन मजूर कुटुंबांची राहण्याची सोय केल्यामुळे काटेकोरपणे शेतीचे नियोजन होते. त्यामुळे त्यांनी मुंबईमध्ये शेतीमाल उत्पादनाच्या विक्री व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईला जाताना त्या उत्पादित शेतीमाल ग्राहकांसाठी पॅकिंग करून सोबत नेतात. काहीवेळा ट्रॅव्हलच्या साहाय्याने हंगामातील मागणीनुसार शेतीमाल मुंबईला मागविला जातो.

'Kalyani Farm' of 'Farm to Home' concept
Agriculture Research : कृषी विद्यापीठांचे संशोधन ‘लॅब टू लँड’ जाणे गरजेचे

हळद प्रक्रियेवर भर ः
अनुराधा घुगे यांनी २०२० मध्ये पहिल्यांदा तीन एकरामध्ये हळदीची लागवड केली. त्यामधून त्यांना सहा टन हळकुंडाचे उत्पादन झाले. २०२१ मध्ये त्यांना चार टन हळकुंडाचे उत्पादन झाले. या हळदीची विक्री त्यांनी परिसरातील बाजारपेठेत केली. २०२२ मध्ये त्यांनी तीन एकर सेलम आणि एक एकर वाहेगाव जातीची लागवड केली आहे. केवळ हळकुंडे विकण्यापेक्षा त्यांनी प्रक्रिया करून हळद पावडर आणि मागणीनुसार हळदीचे लोणचे तयार करून विक्रीवर भर दिला आहे. सुरवातीला कमी प्रमाणात केली जाणारी ही प्रक्रिया यंदा किमान ५० टक्के उत्पादित हळदीवर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबईमध्ये प्रक्रिया केलेली हळद पावडर २५० रुपये प्रति किलो या दराने थेट ग्राहकांना विकली जाते. मागणीमुळे प्रयोग म्हणून केलेले हळद लोणचे १५० ग्रॅम पॅकिंग ६५ रुपये दराने मुंबईतील सोसायटीमध्ये विक्री होते. आजपर्यंत त्यांनी ३५ किलो हळद लोणचे विकले आहे.

'Kalyani Farm' of 'Farm to Home' concept
Poultry : उच्च तंत्रज्ञान व स्वयंचलित पद्धतीचा लेअर पोल्ट्री फार्म

कलिंगड, खरबूज लागवड ः
अनुराधा घुगे या शेतात गेली दोन वर्षे कलिंगड व खरबुजाची लागवड करत आहेत. पहिल्यांदा दोन एकर क्षेत्रात लागवड असलेल्या कलिंगड, खरबुजाची त्यांनी परिसरातील व्यापाऱ्यांना विक्री केली. पहिलेच वर्ष असल्याने उत्पादन कमी आले. पहिल्यावर्षी त्यांनी २ टन खरबुजाची मुंबईत थेट विक्री केली. दुसऱ्यावर्षी बाजारपेठेच्या मागणीनुसार टप्याटप्याने कलिंगड आणि खरबुजाची एक एकर क्षेत्रावर मल्चिंगवर लागवड करत त्यांनी चांगले उत्पादन मिळविले. याचबरोबरीने खरबूज आणि कलिंगडाची मुंबईमध्ये विविध सोसायटीमधील ग्राहकांना विक्री केली. यातून त्यांना खर्च वजा जाता ८० हजारांचे उत्पन्न मिळाले.

'फार्म टू होम' संकल्पना ः
गेल्या तीन वर्षांपासून अनुराधा घुगे या केवळ पीक उत्पादन घेण्यापुरते मर्यादित न राहता काही प्रमाणात का होईना 'फार्म टू होम' संकल्पनेतून थेट ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहेत. कोरोना काळातही त्यांनी संधी मिळेल तसा मुंबईत शेतीमाल थेट विक्री करण्यावर विशेष भर देऊन आपल्या शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्याचा प्रयत्न केला. यातून गेल्या तीन वर्षात त्यांनी त्यांच्या परिसरातील सोसायटीमधील दीडशे कुटुंबांचा व्हॉटसॲप ग्रुप तयार केला आहे. त्यावर हंगामानुसार फळे, भाजीपाला, हळद, हळदीचे लोणचे आदी शेतीमालाची माहिती देतात. मागणीनुसार ग्राहकांना थेट शेतीमालाची विक्री केली जाते.

कुटुंबाची मोलाची साथ ः
शेतीमाल विक्रीसाठी त्यांनी'कल्याणी फार्म' हा ब्रॅण्ड तयार केला आहे. मुंबईमध्ये कांदिवली परिसरातील सोसायटीमध्ये फळे, हळद पावडर, लोणच्याची विक्री केली जाते. यासाठी अनुराधाताईंना त्यांचे पती उद्धवराव तसेच मुलगी कल्याणी आणि मुलगा प्रणव यांची चांगली साथ मिळाली आहे. टप्याटप्याने शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.

'Kalyani Farm' of 'Farm to Home' concept
Soybean Rate : सोयाबीन बाजार कसा राहील?

शेतीचे नियोजन ः
- सिंचनासाठी शेतात चार कूपनलिका, पाइपलाइन.
- सुधारित ठिबक सिंचन तंत्राचा वापर.
- अर्धा एकर क्षेत्र भाजीपाल्यासाठी कायमचे राखीव.
- पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचन.
- बाजाराची गरज पाहून पीक लागवडीचे नियोजन.
- शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठेत जाऊन माहिती घेण्यात सातत्य.
- पुणे, राहाता,सिन्नर, मुंबई, करमाड मार्केटमध्ये डाळिंब विक्री.
-गतवर्षी मोसंबीची ६० रुपये प्रति किलोने मुंबईत विक्री.
- यंदा तीन क्विंटल सीताफळाची ६० रुपये प्रतिकिलोने थेट विक्री.
- शेतीसाठी गांडूळ खताचे उत्पादन.
- शेतीमाल विक्रीसाठी तीन व्यक्तींना कायमचा रोजगार.
- यंदा मिरची, कलिंगड, कांदा घेण्याचे नियोजन.
-शेतमाल साठवणुकीसाठी गोदाम, शेती व्यवस्थापन पाहणाऱ्यांना राहण्याची सोय.
- ॲग्रोवन वाचनातून शेती विकासाला चालना.
------------------------------------------------------------
संपर्क ः अनुराधा घुगे, ९८२०६६१६७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com