Kolhapur News : ‘आपल्याबरोबरच पुढची पिढीही आरोग्यसंपन्न आणि दीर्घायुषी बनविण्यासाठी सेंद्रिय शेतीचे भागीदार व्हा,’ असे आवाहन कणेरी मठाचे सेंद्रिय शेतीचे प्रचारक तानाजी निकम यांनी केले.
येळवडे (ता. राधानगरी) येथे भोगावती नैसर्गिक सेंद्रिय शेतकरी उत्पादक गटाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गटाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील होते. याप्रसंगी ‘आत्मा’चे समन्वयक सुनील कांबळे, डॉ. संग्राम शिंदे, उपाध्यक्ष साताप्पा पाटील, नामदेव सरवळकर, बाळासाहेब पाटील, दिनकर पाटील, सागर धुंदरे यांच्यासह येळवडे, राशिवडे, कोदवडे, घवडे, मोहडे येथील शेतकरी उपस्थित होते.
निकम म्हणाले, ‘रासायनिक खते आणि पाण्याच्या अतिवापरामुळे जमीन नापीक बनत आहे. तिचा पोत बिघडत आहे. प्रत्येक पीक रसायनिक खते आणि औषधाशिवाय येत नाही. आपल्या आरोग्यासह भावी पिढीसाठी हे घातक आहे. अनेक रोग आणि आजार रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे होत आहेत.
जमिनीचे आरोग्य बिघडल्यामुळे हा सगळा प्रपंच असून, जमीन सुधारण्यासाठी आता सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही. जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढविण्यासह नैसर्गिक पद्धतीने पिके घेण्याबाबत प्रयत्नशील राहिले पाहिजे. जाणकार लोक सेंद्रिय मालाला चांगला भाव देऊ शकतात. हे मार्केट शेतकऱ्यांनी पकडून ठेवाावे.’
कृषी पर्यवेक्षक महादेव जाधव यांनी ‘गटशेती आणि सेंद्रिय शेती’ याबाबत माहिती देऊन भविष्यात या शेतीशिवाय पर्याय नसल्याचे त व्यक्त केले. कृषी सहायक सुनंदा आरडे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष पाटील यांनी स्वागत केले. सचिव पांडुरंग कांचनकर यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.