Agriculture Technology : रब्बी, उन्हाळी भुईमुगातील ‘मास्टर’ ठरलेले घुगे

Article by Manik Rasve : परभणी जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील केहाळ (ता. जिंतूर) येथील मधुकर घुगे हे नाव भुईमूग शेतीतील मास्टर शेतकरी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. शंभर एकरांपैकी ८० एकर जमीन विहितीखाली असून, केहाळ व हिवरखेडा शिवारात ती विभागली आहे
Madhukar Ghuge
Madhukar GhugeAgrowon

Success Story of Agriculture :

भुईमुगात मिळवली मास्टरी

मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्राने (बीएआरसी) राज्यातील अकोला, परभणी येथील कृषी विद्यापीठे व लातूर संशोधन केंद्राच्या साह्याने विकसित केलेल्या भुईमुगाच्या विविध वाणांची लागवड घुगे करतात. सुमारे २००१ पासून त्यांचा या पिकातील गाढा अभ्यास, अनुभव व हातखंडा तयार झाला आहे.

घुगे वापरत असले वाण

टीएजी ७३

टीजी ५१

टीएलजी ४५

टीएजी २४

टीएजी ७३- अलीकडील वाण.

यात अकोला, परभणी येथील

वाणांचा पक्व कालावधी- ११० ते ११५ दिवस. जातीनिहाय त्यात काही प्रमाणात फरक.

भुईमुगाच्या अन्य वाणांच्या तुलनेत ‘बीएआरसी’च्या वाणांची सुप्तावस्था. त्यामुळे रब्बीत बीजोत्पादन घेतल्यानंतर उन्हाळी हंगामात त्यांची लागवड करता येते.

त्याची योग्य वेळ- २० जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत

Madhukar Ghuge
Dairy Business : कुटुंबाच्या एकीतून घातली दुग्ध व्यवसायाला गवसणी

घुगे यांचे भुईमूग लागवड तंत्र (ठळक बाबी)

शेतात एका वर्षाआड मेंढ्या बसविल्या जातात. घरच्या जनावरांचे शेण असते. मात्र दरवर्षी एकूण ४० ते ५० ट्रॉली शेणखताचा विकत घेऊन वापर. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते.

जानेवारीत पहिल्या भिजवणीला तुषार सिंचनाद्वारे आठ तास पाणी. पुढे तापमान, जमिनीचा मगदूर व पिकाच्या वाढीनुसार पाण्याचे नियोजन. (जमीन नेहमी वाफशावर ठेवली जाते.) त्यानंतर एकरी तीन बॅग्ज जिप्सम. त्यानंतर वखर पाळी. पुन्हा मोकळ्या मातीचा थर भिजविण्यासाठी रात्री दोन तास तुषार सिंचन.

सकाळी तिफणीने खत पेरणी. एकरी अर्धी बॅग पोटॅश, चार बॅग्ज सिंगल सुपर फॉस्फेट, दोन बॅग १०- २६- २६ सोबत गंधक, जस्त, मॅग्नेशिअम, बोरॉन.

बुरशीनाशक व जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया.

२५ बाय १० सेंमी. अंतरावर टोकण पद्धतीने लागवड. या पद्धतीत एकरी झाडांची संख्या १ लाख ६० हजार ते १ लाख ७० हजार पर्यंत राखली जाते. उत्पादनात वाढ होते.

एकात्मिक कीड नियंत्रणासाठी भुईमूग पिकाभोवती मका आणि चवळी या सापळा पिकांची लागवड.

किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडली तरच कीटकनाशकांची फवारणी

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वा विविध ग्रेडच्या खतांच्या दोन ते तीन वेळा फवारण्या.

पहिल्या आंतरमशागतीसाठी हातकोळप्याचा वापर. कारण या काळात बैलकोळपे चालवल्यास रोपांना इजा होऊ शकते.

लागवडीनंतर ३५ ते ४० दिवसांनी आऱ्या सुटत असताना एकरी ३ बॅग जिप्समचा दोन ओळींमध्ये वापर. त्यानंतर तिफणीला तागाचे वस्त्र गुंडाळून दोन ओळींतून फिरवतात. त्यामुळे जिप्सम जमिनीत मिसळते. आऱ्या जमिनीत खुपसल्या जातात. त्यामुळे फोल शेंगाचे प्रमाण कमी राहते.

काढणी तंत्र

परिपक्वतेनंतर चार ते पाच ठिकाणची झाडे उपटून शेंगा फोडून पाहतात. ८० टक्के शेंगांची टरफले आतून काळी पडल्याचे आढळून आल्यास काढणीस सुरुवात.

काढणी करताना अनेक वेळा शेंगा खुडून जमिनीतच राहिल्या जातात. हे नुकसान टाळण्यासाठी काढणीपूर्वी रात्री दोन तास पाणी देऊन दुसऱ्या दिवशी उपटणे सुरू करतात. त्यामुळे हे प्रमाण कमी होते.

काढणीनंतर शेडनेट कापडाचा मांडव व त्यात शेंगा वाळवितात.

यंत्राद्वारे शेंगांचे ‘ग्रेडिंग’. एक किलो वाळलेल्या शेंगातील दाण्याचे वजन (सेलिंग) विविध वाणांनुसार ७४ ते ८० टक्के असते. टीएजी ७३ चे सर्वाधिक ७८ ते ७९ टक्के.

तीस किलो बारदानात पॅकिंग.

भुईमूग बेवडासाठी अत्यंत चांगले पीक. पीक फेरपालटावर भर देतात. बियाण्याची आनुवंशिक शुद्धता (जेनेटिक प्युरिटी) सर्वांत महत्त्वाची असल्याचे ते सांगतात.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला) येथील शास्त्रज्ञ डॉ. मनीष लाडोले व ‘बीएआरसी’ चे शास्त्रज्ञ डॉ. आनंद बडीगन्नवार यांचे मार्गदर्शन मिळते.

Madhukar Ghuge
Groundnut Crop : ४५०० हजार हेक्टरवर भुईमूग पिकाची पेरणी

भुईमूग उत्पादन (एकरी)

रब्बी..............१२ ते १५ क्विंटल उन्हाळी...........२० ते २२ क्विं.

यंदाच्या रब्बीतील उत्पादन

यंदा प्रथमच २०२३ च्या रब्बीत टीएजी ७३ या वाणाचे ३० गुंठ्यांत बीजोत्पादन.

बुटका, उपट्या प्रकाराचा सुधारित वाण. कालावधी १०५ ते ११५ दिवस.

तीन दाणे असलेल्या शेंगाची संख्या ४० टक्क्यांहून अधिक. तेलाचे प्रमाण ४९ टक्के, तर प्रथिनांचे प्रमाण २४ टक्के.

एक गुंठा क्षेत्रावर ओल्या शेंगाचे ९४ किलो, तर वाळलेल्या शेंगाचे वजन ६०.८१ किलो मिळाले आहे.

सुधारित उन्हाळी मुगाचा प्रयोग

यंदा प्रथमच पिवळ्या मोझॅक रोगाला प्रतिकारक टीआरसीआरएम -१४७ या वाणाची दोन एकरांत लागवड केली आहे. पीक वाढीच्या व फुलोरा, शेंगा लागण्याच्या अवस्थेत व उत्तम आहे. तुलनेसाठी स्थानिक वाणाचीही दोन एकरांत लागवड आहे.

संयुक्त परिवाराचा एकोपा

घुगे ‘ॲग्रोवन’चे पहिल्या अंकापासूनचे वाचक आणि वार्षिक वर्गणीदारही आहेत. पत्नी उज्ज्वला यांची त्यांना समर्थ साथ आहे. स्वप्नील (बी.ई. मॅकेनिकल), ऋषिल (बी.एस्सी.कृषी) व धीरज (बी.बी.ए.) असे तीन मुलगे आहेत. सुना अनुक्रमे सुप्रिया, आश्‍विनी, मनीषा उच्चशिक्षित आहेत. मुलगी डॉ. वैष्णवी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. घुगे यांना बंधू पद्माकर, त्यांची पत्नी विद्या व मुलगा समर्थ यांचीही साथ मिळते. घुगे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार तसेच अन्य नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र अभ्यास मंडळाचे ते सदस्यही आहेत.

मधुकर घुगे,

९७६४९२८८१३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com