Farmer Daughter's Success : अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी होणार डॉक्टर

NEET Exam Success : घरची आर्थिक स्थिती जेमतेम, स्वयंपाकी व थोडी जमीन यामधून मिळणाऱ्या थोड्याथोडक्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह.
NEET Success Story
NEET Success StoryAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकळी (बु.) येथील मयुरी उमेश इंगोले हिने पहिल्याच प्रयत्नात नीटमध्ये ५२७ गुण मिळवित डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाकडे झेप घेतली आहे.

मयूरीचे वडील उमेश इंगोले अल्पभूधारक शेतकरी असून आई अश्‍विनी टाकळी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार स्वयंपाक करते. अतिशय बिकट परिस्थितीतून तिने हे यश मिळविले आहे. इतरांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.

NEET Success Story
Farmer Daughter Success : संघर्षातून वाईबोथी येथील ‘कृषिकन्या’ झाली फौजदार

घरची आर्थिक स्थिती जेमतेम, स्वयंपाकी व थोडी जमीन यामधून मिळणाऱ्या थोड्याथोडक्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह. मात्र गरिबीचे भांडवल न करता त्यांनी इतरांच्या शेतातही मजुरीचे काम पत्करून अभ्यासात हुशार मयूरीला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मुलीला उच्च शिक्षण दिले. त्याचे तिने चीज केले आहे.

विशेष म्हणजे मयूरीचे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक तर येथील जिजामाता हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण झाले. पुढे नांदेड येथे ७५ टक्के स्कॉलरशिपवर तिची नीट क्लासेसमधे निवड झाली.

NEET Success Story
Farmer's Daughter : वडिलांच्या मृत्यूनंतरही धीर धरत शेतकरी कन्येने दिला बारावीचा पेपर

केवळ जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि मेहनत या जोरावर मयूरीने त ५२७ गुण मिळविले. मयूरीच्या यशात आईवडील, प्राथमिक शिक्षक विजय काळे, माध्यमिक शिक्षिका पंकजा काळे यांच्यासह अनेकांचा हातभार असून तिच्या या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

मयूरीचा झाला पहिला सत्कार

मयूरीच्या प्रेरणादायी यशाची कहाणी ऐकून तिचे प्राथमिक शिक्षक विजय काळे, क्रीडा शिक्षक श्याम पांडे, समाजसेवक ओंकार निमकर आदी नुकतेच मयुरीच्या घरी पोहोचले. त्यांनी मयुरीचे कौतुक करीत पुष्पगुच्छ देत तिचा सत्कार केला. गरीबी असतानाही आपल्या मुलीने संपादित केलेले यश, त्यातूनच लेकीचा झालेला पहिला सत्कार पाहून मयूरीचे आई, वडील भावूक झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com