
Chandrapur News : उद्या बारावीचा पेपर असल्याने पोरगी रात्रभर अभ्यास करत होती. मात्र अचानक वडिलांची तब्बेत बिघडली आणि बघता बघता होत्याच नव्हतं झालं. वडिलांनी शेवटचा श्वास घेतला. कुटुंबावर संकटाच आभाळ कोसळलं. प्रचंड अभ्यास करून काहीतरी होण्याच्या स्वप्नाची राखरांगोळी होण्याची स्थिती तिच्यावर आली.
पण आईने हिंमत दिली. घरी बापाचा मृतदेह पडून असताना मोठ्या हिंमतीने ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. डोळ्यात आसवांचा सागर होता. पण धीर एकवटून तिने बारावीचा पेपर सोडविला. पेपर देऊन ती धावतच घरी पोहोचली. अन् वडिलांच्या मृतदेहाजवळ हंबरडा फोडला. आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एका शेतकरी कन्येवर आलेला हा करूण प्रसंग बघताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात आज हा वेदनादायी प्रसंग घडला.
कोठारी येथील लक्ष्मण विरूटकर हे आपल्या तीन एकर शेतीवर कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचे. प्रचंड मेहनत घेत त्यांनी मोठ्या मुलीच लग्न लावून दिलं. पुन्हा एक मुलगी अन् मुलाची जबाबदारी त्यांच्यावर होतीच. पण कालची मध्यरात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. हुशार मुलीला काहीतरी करायचे आहे यासाठी जिवाची बाजी लावणारा बाप गेला.
अन् मग कुटुंबावर आभाळच कोसळल. दुसऱ्या दिवशी त्यांची मुलगी परी हिचा बारावीचा जीवशास्त्राचा पेपर होता. अभ्यास करतानाच तिने आपल्या डोळ्याने वडिलांना अखेरचा श्वास घेताना बघितलं. अन् ती बघतच राहिली.
वडिलांचा मृत्यू झालेला. दुसरीकडे बारावीचा पेपर अशा अवस्थेत काय करायच हे तिला सुचेनासे झाले. पण आईने हिंमत दिल्याने परी परीक्षा केंद्रावर पोहोचली. पेपर सोडविला. एका गरीब शेतकऱ्याच्या वाट्याला आलेला हा करूणप्रसंग बघून उपस्थितांचेही डोळे ओलेच झाले. दुःखद वातावरणात लक्ष्मण विरूटकर यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.