Sericulture Farming : वाशीम जिल्ह्यात रेशीम शेतीकडे वाढतोय कल

District Silk Development Officer Sunil Phadke : पारंपरिक सोयाबीन, गहू, हरभरा या पिकांमधून नफा कमी मिळत असल्याने शेतकरी शेतीपूरक व्यवसायांकडे वळत आहेत. यात प्रामुख्याने रेशीम शेतीकडे कल वाढला आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनील फडके यांनी दिली.
Sericulture
SericultureAgrowon

Washim News : पारंपरिक सोयाबीन, गहू, हरभरा या पिकांमधून नफा कमी मिळत असल्याने शेतकरी शेतीपूरक व्यवसायांकडे वळत आहेत. यात प्रामुख्याने रेशीम शेतीकडे कल वाढला आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनील फडके यांनी दिली.

वाशीम जिल्ह्यात रेशीम शेतीतून शेतकरी एकरी दोन लाखांपर्यंत उत्पन्न काढत आहेत. महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येते. वाशीम जिल्ह्यासाठी २०० एकरचा लक्षांक रेशीम संचालनालयाने दिला होता. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा व रेशीम शेती करत असलेल्या शेतकऱ्यांचा राहेरी व रुई (तालुका गेवराई, जि. बीड) येथे शेतकरी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.

Sericulture
Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

तेथील शेतकऱ्यांचे रेशीम शेतीमधील अनुभव आणि उत्पन्न पाहून वाशीमचे शेतकरी प्रभावित झाले. जे शेतकरी यापूर्वी उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे रेशीम कीटक संगोपन घेत नव्हते त्यांनीही या वर्षी उन्हाळ्यात संगोपन घेऊन यशस्वी कोष उत्पादन घेतले, असेही फडके म्हणाले.

जिल्ह्यातील ‘टो’ या गावातील माधव भिवाजी बोरकर यांनी उन्हाळ्यात दोनशे अंडी पुंजाची बॅच घेऊन १५५ कि‍लो ग्राम कोष उत्पादन काढले. हे कोष ४९० रुपये प्रतिकिलो दराने विकले. त्यांना ७५ हजार ९५० मिळाले. फक्त २८ दिवसांत त्यांनी हे उत्पादन घेतले. वाशीम तालुक्यातील देगाव येथील श्रीमती लता शेषराव येवले आणि बबन राऊत यांनीसुद्धा यशस्वी संगोपन घेऊन ५० हजार रुपये कमावले. रिसोड तालुक्यातील मोप येथील शेतकऱ्यांचे संगोपन सुरू असून यशस्वीरीत्या रेशीम कोष उत्पादित करीत आहेत.

Sericulture
Sericulture Market : पूर्णा येथील मार्केटमध्ये ७५ टन रेशीम कोष खरेदी

तापमान नियंत्रणासाठी उपाययोजना

तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार संगोपन गृहाच्या सर्व बाजूंनी तुतीची झाडे लावली. शेडमध्ये सकाळी व संध्याकाळी पाणी जमिनीवर सोडल्याने आर्द्रता वाढली तसेच तापमान ५ सेल्सिअस कमी ठेवण्यास यामुळे मदत झाली.

रिसोड तालुक्यात नोंदणी जोरात

रेशीम संगोपन व्यवसायाच्या दृष्टीने रिसोड तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या तालुक्यात मोप, आसोला, लोणी खुर्द, बोरखेडी, कण्हेरी, वाडीभर, मोहजा बंदी या गावांत १२५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. लवकरच ते तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपन विषयक प्रशिक्षण घेणार आहेत.

असे मिळते अनुदान

२८ दिवसांच्या कालावधीत ५० हजार रुपये हे एखाद्या नोकरीत मिळणाऱ्या पगारासारखे उत्पन्न राहते. या योजनेसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थीना तीन वर्षांत मजुरी व साहित्यासाठी ४ लाख १८ हजार ८१५ अनुदान दिले जाते.

तर केंद्र पूरस्कृत सिल्क समग्र- २ योजनेतून एक एकरासाठी तुती लागवड, सिंचन संच, कीटक संगोपन गृह, संगोपन साहित्य आणि निर्जंतुकीकरण पावडर यासाठी ३ लाख ७५ हजार अनुदान दिले जाते. सिल्क समग्र-२ या योजनेअंतर्गत अजूनही नोंदणी सुरू आहे तरी इच्छुक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. फडके यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com