China Development: चीनमधील शहरीकरण अन् ग्रामीण विकासाचे मॉडेल

Smart Cities: चीनमधील धोरणकर्त्यांनी शहर आणि ग्रामीण विभागांचा विकास करताना पुढील पन्नास वर्षांचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या २०३० धोरणांच्या अंमलबजावणीसाठी शहरांतील कार्बन उत्सर्जन कमी करणे, अक्षय ऊर्जा वापरास प्राधान्य आणि सामाजिक समावेशकतेवर भर देण्यात आला आहे. हरित आणि स्वच्छ शहरांच्या निर्मितीसाठी हे मॉडेल आदर्श ठरणार आहे.
Rural and Urban Development
Rural and Urban DevelopmentAgrowon
Published on
Updated on

डॉ. विवेक भोईटे

China Rural and Urban Growth: चीन सरकारने येत्या पन्नास वर्षांतील परिस्थितीचा विचारकरून शहरीकरण आणि ग्रामीण विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसारच त्यांचे नियोजन झाले आहे. वाढती लोकसंख्या, हवामान बदल, पुराचा धोका, वादळी परिस्थिती, डोंगर उतारावर होणारे मातीचे भूस्खलन, समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी अशा विविध समस्या ग्राह्य धरून विभागानुसार विकासाला प्राधान्य दिले आहे. यासाठी शास्त्रीय पद्धतीने नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

खेडेगाव, शहरांची संकल्पना

नवीन खेडेगाव आणि शहर विकास करताना `पंधरा मिनिटांचे सामुदायिक जीवन वर्तूळ’ या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. लोककेंद्रित दृष्टिकोनातून लोकांसाठी गाव किंवा शहर तयार करण्याच्या संकल्पनेची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यासाठी रहिवाशांच्या १५ मिनिटांच्या चालण्याच्या परिघात सर्व सेवासुविधा जसे की सर्वसोयीयुक्त हॉस्पिटल, मॉल, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, निसर्गरम्य टेकड्या, स्वच्छ पाणी असणारे तलाव, मानवनिर्मित जंगले, वाचनालय, सरकारी प्रशासकीय कार्यालय, प्रशिक्षण केंद्र, भव्य क्रीडांगण, निसर्गोपचार केंद्र, शेतीमाल खरेदी विक्री केंद्र, रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. यासाठी पुढील शंभर वर्षांचा विचार करण्यात आला आहे.

Rural and Urban Development
Rural Development: ग्रामविकासासाठी सहकार, पंचायती, बचत गटांची मोट बांधणार

ग्रामीण भागाचा विकास करताना महानगरांमधील नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सर्व सेवासुविधा ग्रामीण भागात उपलब्ध झाल्यामुळे शहरात होणारे स्थलांतर नियंत्रणात येणार आहे. विकेंद्रित ग्रामीण विकासावर भर देण्यात आला आहे. यामध्ये पाणी, वीज, स्वच्छता, दळणवळण, रोजगार, शिक्षण, आरोग्य या गोष्टींवर भर देण्यात आला आहे.

आरोग्य : हॉस्पिटल, हेल्थकेअर सेंटर, निसर्गोपचार केंद्र.

शिक्षण : शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांची उभारणी.

वाहतूक : सार्वजनिक वाहतूक प्रणाली, हरित ऊर्जेवरील वाहने.

पायाभूत सुविधा : स्वच्छ पाणी, ऊर्जा बचत योजना, मानवनिर्मित जंगल.

शेती आणि रोजगार: स्थानिक उत्पादन व विक्री केंद्र, स्टार्टअप्स आणि उद्योजकता विकास.

शाश्वत भविष्यासाठी पुढील दिशा

चीनने शहरीकरण आणि ग्रामीण विकासात केलेले प्रयोग इतर देशांसाठी दिशादर्शक ठरणारे आहेत. भविष्यातील हवामान बदल आणि लोकसंख्येच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, शाश्वत विकासासाठी या मॉडेलमधून प्रेरणा घेऊन सर्वसमावेशक धोरणे राबवण्याची आवश्यकता आहे.

पर्यावरणपूरक शहरी विकास: नवीकरणीय ऊर्जा, स्वच्छ वाहतूक आणि हरित पायाभूत सुविधा.

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन: रसायनअवशेषमुक्त शेतीमाल उत्पादनासाठी कृषी धोरणांचे मजबुतीकरण. स्थानिक शेती उत्पादनांचे ब्रँडिंग आणि जागतिक बाजारात प्रवेश.

शहरी नियोजन सुधारणा : १५ मिनिटांच्या जीवन वर्तूळ संकल्पनेची अंमलबजावणी.

खाद्यसुरक्षा आणि संस्कृती संवर्धन : जैविक अन्नप्रक्रियेसह स्थानिक खाद्यसंस्कृतीला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देणे. उच्च दर्जाचे मासेमारी, फळे, भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्यातक्षम प्रक्रिया.

Rural and Urban Development
China Development : चीनमधील शहर, खेड्यांच्या शाश्‍वत विकासाची दिशा

पारंपरिक खाद्य संस्कृतीला स्थान

चीन देशाने आधुनिकतेबरोबरीने पारंपरिक खाद्य संस्कृती जपली आहे. अत्यंत चांगल्या गुणवत्तेचे मासे, मांस, भाजीपाला, फळे, दूध यापासून तयार केलेले विविध पारंपरिक खाद्यपदार्थ येथील हॉटेल्समध्ये उपलब्ध आहेत. विविध रंग आणि सुगंधित फुलांच्या सुक्या पाकळ्यांपासून तयार केलेला चहा, विविध प्रकारच्या झाडांच्या पानांपासून तयार केलेला ‘ग्रीन टी’ हा जगभर प्रसिद्ध आहे. शेतीमालाचे वैशिष्ट्यपूर्ण ब्रॅण्डिंग आणि बाजारपेठेत, दुकानात मांडणी तसेच ग्राहकांच्या पसंत पडेल अशा प्रकारचे कोडिंग हे अगदी प्रत्येक अंड्यावर पाहावयास मिळते. केवळ बेडूक, कीटक खाणे ही संस्कृती नाही तर उच्च गुणवत्ता रसायन अवशेषमुक्त भाजीपाला, मांसाहारातील असंख्य प्रकार, विविध फळे, सॅलेडपासून तयार केलेले सिरप, सरबते हा येथील नागरिकांच्या दैनंदिन आहारातील मेनू आहे. चीनच्या विविध भागात नूडल्सची कृती वेगवेगळी आहे, परंतु त्यात मुख्यतः सेंद्रिय घटकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

पर्यावरणपूरक शहरांची जागतिक स्पर्धा

शहरांच्या शाश्वत विकासासाठी संयुक्त राष्ट्र मानवी वसाहत कार्यक्रमांतर्गत जगातील निवडक शहरांचा अभ्यास करण्यात आला. सर्वांसाठी शाश्वत शहरी भविष्य निर्माण करणे, विविध गरजांसाठी दर्जेदार आणि सुरक्षित घरांच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या शहरांचा सन्मान करणे तसेच कमी कार्बनयुक्त शहरी विकासाचे मुद्दे यामध्ये ग्राह्य धरण्यात आले होते. यामध्ये पाच खंडातील २८ देशांतून ५५ शहरांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यांपैकी १५ शहरांची निवड करण्यात आली. यामध्ये भारतातील तिरुअनंतपुरम या शहराचा समावेश होता. या शहरात स्मार्ट सिटी उपक्रमाद्वारे हरित ऊर्जा, अक्षय ऊर्जा, वाहतूक, अंतर्गत रस्ते, पायाभूत सुविधांचा सामाजिकदृष्ट्या आणि पर्यावरण पूरक विचार करण्यात आला होता. या जागतिक स्पर्धेमध्ये चीन भारत,सौदी अरेबिया याचबरोबरीने मोरोक्को, तुर्कीए, पोर्तुगाल, केनिया, कतार, इटली, इजिप्त, उझबेकिस्तान,चिली,ऑस्ट्रेलिया, मेक्सिको आदी देशातील पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या शहरांचा सहभाग होता.

तिरुअनंतपुरम, भारत : स्मार्ट सिटी अंतर्गत अक्षय ऊर्जा, हरित वाहतूक, मजबूत पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक विकास मॉडेल विकसित.

मदिना, सौदी अरेबिया : शहराच्या पवित्र वारशाचे संरक्षण, आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा.

जिंगडेझेन, चीन : सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर, पर्यावरणपूरक उपाययोजना, झाडांची लागवड आणि स्थलांतरित नागरिकांसाठी रोजगार निर्मिती.

दोहा, कतार : हरित इमारती, जलसंधारण प्रणाली आणि स्मार्ट वाहतूक व्यवस्था.

मिलान, इटली : निसर्गस्नेही आर्किटेक्चर, शाश्वत अन्नपुरवठा व्यवस्था, हवामान बदलासोबत जुळवून घेणारे उपाय.

- डॉ.विवेक भोईटे ७७२००८९१७७ (कृषी विज्ञान केंद्र, बारामती,जि.पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com